Eknath Shinde : विजय शिवतारेंसारखा (Vijay Shivtare) माणूस हवा, दोस्ती करो तो दिलसे, दुश्मनी करो तो भी दिलसे, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना नेते विजय शिवतारे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. दरम्यान, विजय शिवतारे यांचं बंड शमल्यानंतर अखेर आज सासवडमध्ये महायुतीची जाहीर सभा पार पडली. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विजय शिवतारे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल मला लोकांचे फोन यायचे, लोकं भेटून सांगायचे की शिवतारेंना सांगा. त्यानंतर मी शिवतारे यांना बोलावून घेत महायुतीच्या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी ही विचारांची आणि विकासाची लढाई असल्याचं सांगितलं आहे. एवढचं नाहीतर बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना निवडून द्यायंच असल्याचंही सांगितलं. तुमच्या भूमिकेमुळे महायुतीला तडा जाणार आहे, महायुतीचं नूकसान होईल, अशी विनंती केली असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे.
पुण्यात सर्वाधिक मतदार, आदिवासी भागात ‘महिलाराज’, तुमच्या जिल्ह्याची मतदारसंख्या किती ?
काही दिवसांपूर्वी विजय शिवतारे जिद्दीला पेटले होते माझ्याकडे लोकं येत होते. आपल्या नेत्याने निवडणुकीत उभं राहण्यासाठी लोकांची भावना असते. मला भेटीत विजय शिवतारेंनी सांगितलं की मी कशासाठी निवडणुकीत उभा राहत होतो कशासाठी आग्रह होता. विजय शिवतारे यांनी मतदारसंघातील विविध विकासकामांचं पत्रच माझ्याकडे दिलं. आणि म्हणाले की विकासकामे व्हायला हवीत. कारण आता मी घेत असलेल्या भूमिकेवरुन लोकांनी माझ्यावर आरोप करायला नको, त्यामुळे तुम्हाला सासवडमध्ये जाहीर सभेला जनतेला मार्गदर्शन करावे लागेल, शिवतारेंनी सांगताच मीदेखील आजच्या सभेला हजर झालो असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे. विजय शिवतारे यांनी एकनादा निर्णय घेतला की ते मागे हटत नाहीत. माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी माघार घेतली. मला शिवतारेंसारखाच माणूस आवडतो दोस्ती करो तो दिसले दुश्मनी करो तो दिलसे या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंचं यावेळी कौतूकच केलं आहे.