पुण्यात सर्वाधिक मतदार, आदिवासी भागात ‘महिलाराज’, तुमच्या जिल्ह्याची मतदारसंख्या किती ?

  • Written By: Published:
पुण्यात सर्वाधिक मतदार, आदिवासी भागात ‘महिलाराज’, तुमच्या जिल्ह्याची मतदारसंख्या किती ?

Loksabha Election Most voters in Pune : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरू आहे. देशात महाराष्ट्र हे सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचे राज्य आहे. महाराष्ट्रातून 48 खासदार निवडून दिले जातात. राज्यात सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार आहेत. त्यात सर्वाधिक मतदार हे पुणे (Pune) जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघात आहेत. या जिल्ह्यात तब्बल 80 लाखांहून अधिक मतदार आहेत. तर चार जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा सर्वाधिक आहे. त्यातील दोन जिल्हे सर्वाधिक आदिवासी भागातील आहेत.

राज्यात किती मतदार ?

राज्यात 9 कोटी 24 लाख 91 हजार 806 मतदारांची नोंद आहे. यामध्ये 4 कोटी 80 लाख 81 हजार 638 पुरुष मतदार आहे. तर 4 कोटी 44 लाख 04 हजार 551 महिला मतदार आहेत. तर 5 हजार 617 तृतीयपंथी मतदार आहेत.
पुरुष मतदारांपेक्षा स्त्री मतदारांची संख्या सुमारे 36 लाखांनी कमी आहे.

पुण्यात सर्वाधिक 82 लाख मतदार; नंतर नंबर कुणाचा ?
पुणे जिल्ह्यातील मतदारसंख्या 82 लाख 82 हजार 363 आहे. त्यानंतर दोन नंबरला मुंबई उपनगरचा क्रमांक आहे. या जिल्ह्याची मतदार संख्या 73 लाख 56 हजार 596 इतकी आहे. ठाण्याची मतदार संख्या 65 लाख 79 हजार 588, नाशिक जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या 48 लाख 08 हजार 499 इतकी आहे. तर नागपूरची मतदार संख्या 42 लाख 72 हजार 366 इतकी आहे.


रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया आणि सिंधुदुर्गात महिलाराज

रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया आणि सिंधुदुर्गात महिला मतदारांची संख्या अधिक आहे. रत्नागिरीत मतदार संख्या 13 लाख 03 हजार 939 आहे. यामध्ये 11 तृतीयपंथींची नोंद आहे. तर पुरुष मतदारांची संख्या 6 लाख 31 हजार 012 आहे. महिला मतदारांची संख्या 6 लाख 72 हजार 916 इतकी आहे. नंदुरबारची मतदार संख्या 12 लाख 76 हजार 941 आहे. यामध्ये 12 तृतीयपंथीची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 6 लाख 37 हजार 609 आहे तर महिला मतदारांची संख्या 6 लाख 39 हजार 320 इतकी आहे. गोदिंया जिल्हयातही महिला मतदारांची संख्या जास्त आहे. गोंदियाची एकूण मतदार संख्या 10 लाख 92 हजार 546असून यामध्ये 10 तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 5 लाख 41 हजार 272 आहे तर महिला मतदारांची संख्या 5 लाख 51 हजार 264 इतकी आहे. सिंधुदुर्गची मतदार संख्या 6 लाख 62 हजार 745 आहे. यामध्ये 1 तृतीयपंथीची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 3 लाख 30 हजार 719 आहे. तर महिला मतदारांची संख्या 3 लाख 32 हजार 025 इतकी आहे.

अहमदनगर, कोल्हापूर, संभाजीनगरला किती मतदार ?
अहमदनगर, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या पाच जिल्ह्यांमध्ये 30 लाखांहून अधिक मतदार आहेत. अहमदनगरमध्ये दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. या दोन्ही मतदारसंघात 36 लाख 47 हजार 252 आहेत. सोलापूरमध्ये 36 लाख 47 हजार 141 मतदार आहेत. जळगावमधील मतदारसंख्या 35 लाख 22 हजार 289 इतकी आहे. कोल्हापूरमध्ये एकूण मतदार 31 लाख 72 हजार 797 आहेत. छत्रपती संभाजीनगर मध्ये मतदार 30 लाख 48 हजार 445 इतके आहेत.

‘या’ दहा जिल्ह्यांमध्ये 20 लाखांहून अधिक मतदार

बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, रायगड, मुंबई शहर, बीड, सातारा, सांगली आणि पालघर या 10 जिल्ह्यांमध्ये 20 लाखांहून अधिक मतदार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज