Ajit Pawar Birthday : राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? या एकाच प्रश्नावर जशी महाविकास आघाडीत (MVA) धुसफूस दिसते तशीच परिस्थिती महायुतीतही (Mahayuti) आहे. नेत्यांच्या मनात सुप्त इच्छा असतेच. या सुप्त इच्छेचे प्रकटीकरण या नेत्यांचे कार्यकर्ते सोशल मीडिया, बॅनर अन् वाढदिवसाच्या केकच्या माध्यमातून करतात. याचा अनुभव सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील प्रमुख नेत्यांनी घेतला आहेच. पण, अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबतीत ही गोष्ट जरा जास्तच प्रमाणात दिसून येते. अजितदादांचे उत्साही कार्यकर्ते अधूनमधून अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील अशी इच्छा व्यक्त करतात. आताही या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत अजितदादांना भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत.
शरद पवार-अजित पवार एकत्र येतील; पण काही महत्वाकांक्षी नेत्यांना..सुनिल शेळकेंचा रोख कुणाकडं?
अजित पवार यांचा उद्या (22 जुलै) वाढदिवस आहे. त्याआधी आज अजितदादा पुणे (Pune) दौऱ्यावर आहेत. येथे मात्र कार्यकर्त्यांनी एक दिवस आधीच त्यांचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त खास केक होता. या केकवर मी अजित आशा अनंतराव पवार महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की.. असा मजकूर लिहिलेला होता. कार्यकर्त्यांचं प्रेम आणि शुभेच्छा देण्याची खास आयडीया पाहून अजितदादांना हसू आवरलं नाही. स्मितहास्य करत त्यांनीही मोठ्या आनंदानं हा वाढदिवस साजरा केला.
केक खाल्ला. केकवरील मजकूर वाचून अजितदादांनी स्मितहास्य केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी अजित पवार राज्याचे भावी मुख्यमंत्री (Maharashtra CM) म्हणून शुभेच्छाही दिल्या. अजित पवारांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच पिंपरी चिंचवड शहरात मोठे बॅनर लागले आहेत. मुंबईतील मंत्रालय आणि विधिमंडळ परिसरातही अजित पवारांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे फलक लागले आहेत. अजित पवार यांच्या बरोबरच भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचाही वाढदिवस उद्याच आहे. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी दोघांना शुभेच्छा देणारे फलकही लावले आहेत.
DPDC Meeting : बारामतीच्या दूषित पाण्यावर अजित पवार-शरद पवारांमध्ये जुंपली