Download App

Dimbhe Dam : आंबेगाव तालुक्यातील जनता कधीही बोगदा होऊन देणार नाही, वळसे पाटील आक्रमक

डिंभे धरणाच्या तळाशी बोगदा करून त्याचे पाणी नगर-जामखेड भागात नेणाऱ्या प्रकल्पाला आमचा विरोध कायम आहे. - वळसे पाटील

  • Written By: Last Updated:

Dilip Walse Patil : डिंभे धरणाच्या (Dimbhe Dam) तळाशी बोगदा करून त्याचे पाणी नगर-जामखेड भागात नेणाऱ्या प्रकल्पाला आमचा विरोध कायम आहे, आंबेगाव (Ambegaon) तालुक्यातील जनता कधीही बोगदा होऊन देणार नाही, असं अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले.

तनपुरे गटाला भगदाड! सडे गावातील युवकांचा कर्डिलेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश 

दिलीप वळसे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, नगर जिल्ह्याला पाणी न्यायला आपला विरोध नाही. मी नगर जिल्ह्याचा 10 वर्ष पालकमंत्री होती, मात्र तेव्हा कधी पाण्याच्या प्रश्नावरून वाद निर्माण झाला नाही. त्यांना जेवढं पाणी पाहिजे होतं, तेवढं पाणी आपण देतच आलोय. मात्र, आता काही जण बोगद्याचं मुद्दा उपस्थित करून राजकारण करत आहे, अशी टीका त्यांनी रोहित पवार यांच्यावर नाव न घेता केली.

Skoda Kylaq अखेर लॉन्च, 6 एअरबॅग, भन्नाट फीचर्स अन् किंमत फक्त 7.89 लाख 

वळसे पाटील म्हणाले, कुकडीचा प्रकल्प पाच धरणांचा प्रकल्प आहे. चार धरणं जुन्नर तालुक्यात आहे. एक धरण आंबेगाव तालुक्यात आहे. या धरणाची क्षमता 13 टीमएसी पाणी साठवून ठेवण्याची आहे. तीन-चार टीमएसी पाणी वाहून जातं. मात्र, काही लोकांचा प्रयत्न वेगळा आहे. बोगदा पाडून डिंभे धरणातून पाणी न्यायचा त्यांचा प्लॅन आहे. मात्र, बोगदा पाडून पाणी नेण्याला आमचा विरोध आहे, असं वळसे पाटील म्हणाले.

बोगदा पाडल्यास धरण तीन महिन्यात रिकामे होईल…
डिंभे धरणाला एवढा मोठा बोगदा पाडला तर तीन महिन्यात धरण रिकाम होईल आणि आपला तालुका दुष्काळी राहिल. या धरणाच्या उजव्या कालव्यावर आंबेगाव, शिरूर तालुक्यातील शेतीचे सिंचन केले जाते. बोगदा पाडल्यास शेतीचा प्रश्न ऐरणीवर येईल. त्यामुळं या बोगद्याला मी कधीच संमती दिली नाही. धरण भरल्यानंतर जे तीन-चार टीएमसी पाणी वाहून जातं, ते कसं नेता येईल याचा विचार त्यांनी करावा, असं वळसे पाटील म्हणाले.

अजित पवार गटाने आपला जाहिरनामा तयार केला. यावर बोलतांना वळसे पाटील म्हणाले, 20-25 वर्षापासून आंबेगाव-शिरूर मतदारसंघ हा दुष्काळी होता. या मतदारसंघात आपण मोठ्या प्रमाणात विकास घडवून आणला. पुन्हा आमदार म्हणून निवडून आल्यावर सिंचनाचा प्रश्न सोडवायचा आहे. शिरूरमधील 12 गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. बहुतेक गावात महिलांना अस्मिता धोरण राबवणार आहे याशिवाय, स्पोर्ट्स कॉम्लेप्स उभारू, आरोग्यविषयक सुविधा निर्माण करू, असं वळसे पाटील म्हणाले.

follow us