Download App

बापटांच्या जागी कोण? सूनबाईंपासून मोहोळ, मुळीक यांसह अनेक नावे चर्चेत

  • Written By: Last Updated:

By Poll Election On Girish Bapat Place : भाजपचे खासदार आणि पुण्याचे माजी पालकमंत्री गिरीष बापट (Girish Bapat) यांचे काल दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने आता रिक्त झालेल्या जागेवर पोट निवडणूक (By Poll Election) लागण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. लोकसेभेच्या निवडणुकांसाठी अजून एक वर्षांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे नियमानुसार येथे पोट निवडणूक घेणे आवश्यक आहे. ही निवडणूक सहा महिन्यांच्या आत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आता बापटांच्या जागेवर कोणाला संधी मिळणार यासाठी जोरदार चर्चा पुणे शहरात सुरू झाल्या आहेत.

कोर्टाने दाखविली सरकारची औकात, मुख्यमंत्री तर स्वतः गुलाम; संजय राऊतांचा घणाघात

गिरीश बापट यांचे सर्वपक्षीय संबंध होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात उमेदवारी दिल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असे मत काही राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. मात्र, असे असतानाही पक्षातील इतर नेत्यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सध्या सुरू झाली आहे. यात आघाडीवर माजी खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) आणि भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांची नावे आहेत. त्यामुळे वरील नावांचा विचार होणार की, बापट यांच्याच घरात तिकीट देऊन ही निवडणूक बिनविरोध होणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

बापटांच्या सुनेला तिकीट मिळणार?
बापट यांच्या निधनानंतर आता येथे नियमानुसार पोट निवडणूक घ्यावी लागणार आहे तीसुद्धा येत्या सहा महिन्यात. त्यात बापट यांचे चिरंजीव गौरव बापट हे राजकारणात सक्रीय नाही. त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार येथे होऊ शकणार नाही. मात्र, बापट यांच्या सूनबाई स्वरदा (Swarda Bapat) या राजकारणातील आहेत. त्या सांगलीच्या माजी नगरसेविकादेखील होत्या. त्यामुळे त्यांना या ठिकाणी तिकीट देऊन ही निवडणूक बिनविरोध करण्याचा विचार भाजपकडून केला जाऊ शकतो. मात्र, स्वरदा या पुण्यात नवीन आहेत, त्यामुळे माजी खासदार अनिल शिरोळे (Anil Shirole), संजय काकडे, माजी महापौर मुरलीधर मोहळ, आमदार माधुरी मिसाळ यांच्या नावांपैकी एकाचा विचार पक्षाकडून केला जाऊ शकतो अशीही चर्चा दुसरीकडे सुरू आहे.

‘ना हार की फिक्र करते है, ना जीत का जिक्र’.. खासदार राणांचा रावनवमीचा लूक पाहिलात का ?

चर्चेत असलेल्या नावांमध्ये मुरलीधर मोहोळ हे तरूण आणि लोकप्रिय असे व्यक्तीमत्व आहे. पुणे महापालिकेत महापौर म्हणून काम करताना त्यांची कामसू महापौर म्हणून ओळख निर्माण झाली आहे. त्याशिवाय सध्या ते भाजपचे सरचिटनीस पदाची जबाबदारी संभाळत असून, त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. याशिवाय माजी खासदार अनिळ शिरोळे हे जुने आणि अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी बापट यांच्यासोबतही काम केले आहे. त्यामुळे त्यांना शहरातील विकास आणि नागरिकांची नाळ याची बित्तम माहिती आहे. तर, दुसरीकडे संजय काकडे आणि माधुरी मिसाळ यांचीदेखील पुणे शहरातील राजकारणात वेगळी ओळख आहे. त्यामुळे आता रिक्त जागेवर नेमकी कुणाला संधी दिली जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Devendra Fadanvis यांना अश्रू अनावर : गिरीशभाऊ आमच्यासाठी जेवण बनवायचे…

कायदे तज्ज्ञांचे मत काय?
१९५१ सालचा 151 A लोकप्रतिनिधी कायद्यानुसार जर १ वर्षाची मुदत राहिली असेल तर निवडणुक घ्यावी लागणार आहे. लोकसभा निवडणूक २०२४ मे एप्रिल मध्ये होत आहे. सध्या मार्च चालू असल्याने १ वर्षावरुन अधिक काळ आहे. यामुळे ही निवडणुक घ्यावी लागणार आहे आणि ही निवडणुक ६ महिन्याच्या आत घ्यावी लागणार आहे. अशी माहिती कायदेतज्ज्ञ उल्हास बापटांनी दिली आहे. विधानसभेची निवडणुकीसारखीच लोकसभेचीही निवडणुक होणार आहे. दोन्ही नियमात कोणताही फरक नाही. लोकसभा निवडणूक एप्रिल, मे २०२४ मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags

follow us