‘ना हार की फिक्र करते है, ना जीत का जिक्र’.. खासदार राणांचा रावनवमीचा लूक पाहिलात का ?
Ram Navami 2023 : आज देशभरात रावनवमीची धूम आहे. प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. रावनवमीच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यात आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचा अनोखा अंदाज सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तत्कालीन ठाकरे सरकारशी पंगा घेणाऱ्या राणांचा हा नवा लूक लोकांनाही चांगलाच भावतो आहे. डोक्यावर बांधलेली भगवा गमछा अन् बुलेटवर बसून रपेट मारताना मुखी श्रीरामाचा जयघोष.. असा त्यांचा लूक दिसत आहे. खास रामनवमीनिमित्त राणांनी अशला हटके शुभेच्छा दिल्या आहेत.
नितीन गडकरींची मोठी घोषणा! मुंबई- गोवा महामार्ग कामाची डेडलाईन जाहीर
‘हम तो अखंड ब्रह्मांड के राजा श्रीराम के भक्त है’, ‘ना हार की फिक्र करते है, ना जीत का जिक्र करते है’.. ‘जय श्रीराम’ असे म्हणत त्या स्वतः बुलेट चालविताना या व्हिडिओत दिसत आहे. त्यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडिओ त्यांनी एक तासापूर्वी ट्विट केला असून फक्त अर्ध्याच तासात दोन हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
राम नाम का नारा है, हर घर भगवा छाया है, श्री राम नवमी के शुभ अवसर पर बुलेट राइडिंग करते हुए।
जय श्री राम।। जय हनुमान।।#RamNavmi #रामनवमी #ramnavami2023 pic.twitter.com/rRH2wPQ2Lz— Navnit Ravi Rana (@navneetravirana) March 30, 2023
दरम्यान, मुंबई, दिल्ली, अयोध्या आणि अमरावतीत राणा यांचे हिंदू शेरणी नावाचे फलक लागले आहेत. तसेच 6 एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्त त्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत हनुमान चालीसा पठण करणार आहेत.
याबरोबरच त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य केले. त्या म्हणाल्या, उद्धव ठाकरे यांच्यात अहंकार आहे. हनुमान चालीसा वाचली नाही म्हणून त्यांची सत्ता गेली, पक्ष गेला. आता तरी उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा पठण करावे असे राणा यांनी म्हटले आहे.