नितीन गडकरींची मोठी घोषणा! मुंबई- गोवा महामार्ग कामाची डेडलाईन जाहीर

नितीन गडकरींची मोठी घोषणा! मुंबई- गोवा महामार्ग कामाची डेडलाईन जाहीर

Mumbai- Goa Highway : तब्बल 12 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई- गोवा रस्त्याचे (Mumbai- Goa Highway) चौपदरीकरणाच्या कामाचे आज चौथ्यांदा भूमिपूजन करण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांच्या हस्ते पळस्पे ते कासू मार्गाच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन खारपाडा टोलनाका याठिकाणी पार पडली आहे. (Palaspe to Kasu Road work) यावेळी नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली. कोणत्याही परिस्थितीमध्ये डिसेंबर महिना अखेर संपूर्ण महामार्ग पूर्ण होणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.

महामार्गाचं काम 9 महिन्यांत पूर्ण

मुंबई- गोवा महामार्गाविषयी मात्र मी दुःखी आहे. १० हजार कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली होती. या रस्त्याच्या कामानंतर पर्यावरणाच्या दृष्टीने फायदा होणार आहे, असे यावेळी नितीन गडकरी यांनी सांगितल आहे. दरम्यान, गेल्यावर्षी इंदापूर ते कासू दरम्यानच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले होते. अजून देखील त्या कामाला सुरुवात झाली नाही. यामुळे कोकणवासीयांमध्ये नाराजीचा असल्याचे दिसून येत आहे.

छ. संभाजीनगरमधील दंगलीला BJP अन् MIM जबाबदार; दानवेंचा आरोप

दरम्यान आजच्या भूमिपूजनामुळे कामाला वेग येणार असल्याचा दावा खासदार सुनील तटकरे यांनी गवळी सांगितल आहे. मुंबई- गोवा महामार्गाचे काम डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी दिले आहे. यावेळी मुंबई- गोवा महामार्गाचं काम पुढील ९ महिन्यामध्ये पूर्ण करण्याची जबाबदारी घेत असल्याचे नितीन गडकरींनी यावेळी सांगितल.

तसेच कामं न केल्यास, कामांमध्ये अडचणी आणणाऱ्यांवर कारवाईचा इशारा नितीन गडकरींनी दिला. पळस्पे ते इंदापूर या मार्गाचे काम यावर्षी डिसेंबरच्या आत पूर्ण करण्यात येणार आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचा रस्ता तयार करण्याचा प्रयत्न राहणार आहे, असे गडकरी म्हणाले. रस्त्यावर ८ इंच टॉपिंग करण्याच्या ठराव करण्यात आले होते. चारपदरी मार्ग तयार करण्यात येणार आहे. तसेच अपघात निवारण समिती देखील स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक २ महिन्यांनी बैठक घेऊन ब्लॅक स्पॉट, अपघातस्थळची पाहणी करावी, असे सूचना देण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube