कोर्टाने दाखविली सरकारची औकात, मुख्यमंत्री तर स्वतः गुलाम; संजय राऊतांचा घणाघात

कोर्टाने दाखविली सरकारची औकात, मुख्यमंत्री तर स्वतः गुलाम; संजय राऊतांचा घणाघात

‘न्यायालयानेच राज्य सरकारला नंपुसक म्हटले आहे. जनताही तेच म्हणत आहे. न्यायालयानेच म्हटले आम्ही तर म्हणालो नाही. यावरुनच सरकारची काय पत आहे ?, प्रतिष्ठा आहे ? हे दिसून येते. हे सरकार कशा पद्धतीने सत्तेवर आले आणि काम करत आहे हे सुद्धा स्पष्ट होत आहे. कोर्टाच्या टिप्पणीने सरकारची औकात कळली आहे. शिंदे सरकारचा जीव हा खोक्यात आहे’, अशी टीका खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

न्यायालयाने काल राज्य सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. सरकार नपुंसक असून काहीच करत नसल्याचे म्हटले. सरकार गप्प बसले आहे त्यामुळे सर्व काही घडत आहे. राजकारण आणि धर्म वेगळे ठेवण्याची वेळ आली आहे. न्याय. जोसेफ यांनी राज्य सरकारच्या वकिलांना फटकारले. यावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्य सरकारला घेरले आहे.

Satej Patil यांचं महाडिकांना आव्हान : कुस्ती लढायची असेल, तर मर्दासारखं लढा…

संजय राऊत म्हणाले, ‘न्यायालयाने सरकारच्या कार्यपद्धतीवर एकच हातोडा मारला आहे आता तरी सरकारचे डोके ठिकाणावर यावे. जनतेचे डोके ठिकाणावरच आहे.’ ‘राज्याचे मुख्यमंत्री रोजच स्वतःला गुलाम असल्याची जाणीव करून देत आहेत. बसू का ?, जेऊ का ?, खाऊ का ?, डोळे उघडू का ?, डोळे मिटवू का ?, असे त्यांचे चालले आहे. न्यायालयाने सुद्धा वेगळ्या शब्दांत हेच सांगितले जात आहे. कोर्टाच्या टिप्पणीने सरकारची औकात कळली आहे. शिंदे सरकारचा जीव हा खोक्यात आहे’, असे त्यांनी म्हटले.

शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्याप्रकरणी खंडपीठाची सरकारला नोटीस

सभा दणक्यातच होणार 

राज्यात महाविकास आघाडीच्या सभा दणक्यात होतील. शिवसेनेच्याही सभा त्याच पद्धतीने होतील. यामध्ये कितीही अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तरी त्यात यश येणार नाही. आमची पुढील सभा जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे दोन गटात झालेल्या दंगलीवरून राऊत यांनी सरकावर गंभीर आरोप केला. राज्यात दंगली घडाव्यात अस्थिरता रहावी असे काम सरकार करत आहे. सरकारचा तोच हेतू आहे. राज्यात असेच वातावरण रहावे अशी सरकारची इच्छा असून त्यासाठी मिंधे गटाच्या टोळ्या काम करत आहेत असा आरोप राऊत यांनी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube