IAS Pooja Khedkar : आयएएस पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) प्रकरणात दररोज नवनवीन गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. लाल दिवा ते अपंगत्वाचं खोट प्रमाणपत्र असे अनेक प्रकरणे समोर आले आहेत. अशातच आता अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी पूजा खेडकरने पुण्यातला पत्ता दिला होता. या पत्त्यावर पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांची अनधिकृत कंपनी असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून कंपनीवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पूजा खेडकर आहे की झोलकर? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
‘नातं टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण…’, हार्दिकने केले घटस्फोटावर शिक्कामोर्तब
पूजा खेडकर हिने पहिल्यांदा अहमदनगरमधील सिव्हील हॉस्पिटलमधून आपण दृष्टीहीन असल्याचं दिव्यांगांच प्रमाणपत्र मिळवलं. यावेळी तिने अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील भालगावचा पत्ता दिला होता. त्यानंतर तिने पुण्यातील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवलं. त्यासाठी तिने पुण्यातील पिंपरी चिंचवडचा पत्ता दिला होता. त्याच पत्त्यावर पिंपरी चिंचवडमधील ज्योतिबा नगर तळवडे इथं आई मनोरमा खेडकर यांची थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. या कंपनीने महापालिकेचा 2 लाख 77 हजार रुपयांचा कर बुडवला असून ही कंपनी रेडझोनमध्ये असल्याचं समोर आलं आहे. अर्थात ही कंपनीही अनधिकृत असल्याचं स्पष्ट झालंय.
NEET-UG परीक्षेतील विद्यार्थ्यांचे गुण ऑनलाईन अपलोड करा, सुप्रीम कोर्टाचा एनटीएला आदेश
पूजा खेडकर हिचे आत्तापर्यंत बोगस कागदोपत्रांची अनेक प्रकरणे समोर आली असून केंद्र सरकारकडूनही तिच्या या झोलची दखल घेण्यात आलीयं. केंद्र सरकारकडून तिच्या चौकशीसाठी एका समितीची नेमणूक करण्यात आली आहे. तर तिच्या ट्रेनिंगवरही होल्ड लावण्यात आलायं. अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी तिने पुण्यातलं निवासस्थान दाखवलं होतं. हे निवासस्थान अनधिकृत असल्याने कंपनीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका हातोडाही चालवू शकते, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिलीयं.
धोतर परिधान केले म्हणून मॉलमध्ये प्रवेश नाकारला; बेंगळुरूतील धक्कादायक प्रकार
मुळशीमध्ये एका जमीनी प्रकरणासंदर्भात पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांनी एका शेतकऱ्याला हातात पिस्तूल घेऊन दमदाटी केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालसकर नामक शेतकऱ्याने मनोरमा खेडकर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर मनोरमा खेडकर यांनी पुण्यातून पळ काढत रायगडच्या एका हॉटेलात आसरा घेतला. मात्र, पोलिसांनी त्यांना अटक केली.