Download App

छोटा राजनचा फोन अन् गोळीबार, सुरेंद्र अग्रवालांकडून हत्येचा प्रयत्न; अजय भोसलेंचे गंभीर आरोप

Kalyani Nagar Car Accident अग्रवालांनी माझ्या हत्येची सुपारी छोटा राजनला दिली होती. अजय भोसले यांचे गंभीर आरोप

Kalyani Nagar Car Accident Ajay Bhosale Serious Allegations on Surendra Agrawal : पुण्यातील कल्याणीनगर अपघातातील ( Kalyani Nagar Car Accident) मुलाच्या आजोबांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्याशी संबध असल्याची माहिती समोर आल्यानंतर आता सुरेंद्र अग्रवालांकडून ( Surendra Agrawal ) आपल्या हत्येची सुपारी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला देण्यात आली होती. असे गंभीर आरोप हत्येचा प्रयत्न केल्या गेलेल्या अजय भोसले ( Ajay Bhosale ) यांच्याकडून करण्यात आले आहेत. त्यामुळे या कुटुंबाचं हे अपघात प्रकरणच नाही तर आजोबांपासूनची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर येत आहे. तसेच या घटनेमध्ये तपासाची चक्र पुढे जात असताना नवनवीन गौप्यस्फोट होत आहेत.

पवनची पावर डाऊन! भोजपुरी स्टार पवन सिंगची भाजपमधून हकालपट्टी

यावेळी बोलताना अजय भोसले म्हणाले की, सुरेंद्र अग्रवाल यांच्या भावाशी माझी मैत्री होती. अग्रवाल यांच्या दोन भावांमध्ये संपत्तीवरून वाद सुरू होते. या दरम्यान सुरेंद्र कुमार हे बँकॉक येथे छोटा राजन याची भेट घेऊन आले. त्यावेळी त्यांनी माझा भाऊ माझे पैसे देत नाही. त्याला अजय भोसले हे मदत करत आहे. अशी माहिती छोटा राजनला दिली होती. त्यावेळी मला छोटा राजन चे फोन येत होते.

‘आदित्य ठाकरेंना CM करा रश्मी ठाकरेंचा आग्रह पण, शरद पवारांचा नकार’; अजित पवार गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट

त्यानंतर सुरेंद्र कुमार यांनी थेट माझी सुपारी दिली. 2009 साली मी शिवसेनेच्या तिकिटावर वडगाव शेरीमधून विधानसभेची निवडणूक लढवत होतो. त्यावेळी सकाळी साडेदहा वाजता माझ्यावर गोळीबार झाला. सुदैवाने मी त्यामध्ये बचावलो. मात्र माझ्या मित्राच्या छातीत गोळी लागली. या प्रकरणामध्ये सुरेंद्र कुमार यांचे नाव देखील समोर आले होते. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. हे कुटुंब पैशाच्या जोरावर सगळं काही खरेदी करतं त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही. असे गंभीर आरोप भोसले यांनी केले आहेत.

Box Office: राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’च्या कमाईत मोठी घट, कमावले फक्त ‘इतके’ कोटी

दरम्यान भावांसोबत झालेल्या संपत्तीच्या वादामध्ये सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी छोटा राजनची मदत घेतली होती. या वादात अजय भोसले यांच्या हत्येचा प्रयत्न देखील झाला होता. या प्रकरणी सुरेंद्र कुमार यांच्या विरोधात बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र यामध्ये पुणे पोलिसांकडून मोक्का लावणे अपेक्षित असताना केवळ आयपीसीची कलमं लावून गुन्हा दाखल केला होता. तसेच आरोपपत्र दाखल करेपर्यंत सुरेंद्र कुमार यांना अटकही झाली नव्हती. त्यामुळे पुणे पोलिसांच्या कारवाईवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

follow us

वेब स्टोरीज