Download App

Pune Loksabha News : पुण्यात धक्कादायक प्रकार, कॉंग्रेस शहराध्यक्षांच्या नावावर बोगस मतदान

काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांच्या नावावर बोगस मतदान झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातून उडकीस आला.

Bogus Voting : महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi)प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांच्या नावावर बोगस मतदान (Bogus Voting ) झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातून उडकीस आला. खुद्द शिंदे यांनीच हा आरोप केला आहे.

Rajkumar Rao च्या श्रीकांतला विकेंडचा फायदा; पहिल्या दिवशीच्या तुलनेत चौपट कमाई 

आज राज्यातील नगर, शिर्डी,बारामती, पुणे अशा अकरा लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू आहे. पुण्यातील कॉंग्रेसचे नेते अरविंद शिंदे सकाळी अकरा वाजताच्या सुमारास सेंट मीरा स्कूलमध्ये मतदानासाठी गेले असता त्यांच्या नावावर मतदान झाल्याचे निदर्शनास आलं. मात्र तरीही शिंदे यांना टेंडर व्होट अंतर्गत मतदानाची संधी देण्यात आली. तथापि, त्याची गणना आपत्कालीन परिस्थितीत केली जाऊ शकते, त्यामुळं शिंदे यांचं मत वाया गेल्यातच जमा आहे.

‘केजरीवाल, तुम्ही महिलांचा आदर करायला शिका…’; मालिवाल यांच्या कथित आरोपानंतर भाजप आक्रमक 

दरम्यान, मतदान केंद्रावर पोहोचण्यापूर्वीच अरविंद शिंदे यांच्या नावाने मतदान करण्यात आल्याने अरविंद शिंदे यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी ऑनलाइन तक्रारही केली आहे.

याबाबत बोलतांना शिंदे म्हणाले की, मी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचलो, परंतु माझ्या नावावर एक रेड लाईन मारलेली होती. मला सांगितलं की, तुमचं मतदान झालं आहे. माझ्या नावासमोर दुसऱ्याचा शिक्का आणि सही देखील वेगळी असल्याचे दिसून आलं. विशेष म्हणजे येथील आधार कार्डचा नंबरही माझा नव्हता. यावेळी पोलिंग एजंटने बोलण्याचा प्रयत्न केला तर तिथं दमबाजी करण्यात आल्याचं, शिंदे म्हणाले. ते म्हणाले, मी या भागातून ४ वेळा नगरसेवक राहिलो आहे. येथील जनता मला चांगल्या प्रकारे ओळखते. अरविंद तुकाराम शिंदे असं नाव घेतले असते तरीही मला ओळखलं असतं. मात्र, माझ्याच नावान बनावट मतदान झाल्याचं उघडकीस आलं. या घटनेनंतर मी टेंडर व्होट करून आलोय, ऑनलाइन तक्रारही केली असल्याचं शिंदे म्हणाले.

 

 

follow us

वेब स्टोरीज