Rajkumar Rao च्या श्रीकांतला विकेंडचा फायदा; पहिल्या दिवशीच्या तुलनेत चौपट कमाई

Rajkumar Rao च्या श्रीकांतला विकेंडचा फायदा;  पहिल्या दिवशीच्या तुलनेत चौपट कमाई

Rajkumar Rao film Shrikanth huge earnings compare to Day First : अभिनेता राजकुमार राव ( Rajkummar Rao ) हा वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्याची प्रत्येक नवी भूमिका ही त्याच्या आधीच्या भूमिकेपेक्षा वेगळी असते. आता त्याचा ‘श्रीकांत’ ( Shrikanth ) हा चित्रपट रिलीज झाला आहे.

‘केजरीवाल, तुम्ही महिलांचा आदर करायला शिका…’; मालिवाल यांच्या कथित आरोपानंतर भाजप आक्रमक

या चित्रपटाने पहिल्याच दिवशी दमदार कामगिरी केली आहे. पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ₹ 2.41 CR गोळा केले. तर आता विकेंडचा देखील या चित्रपटाला प्रचंड फायदा झाला. त्यामुळे चित्रपटाने विकेंडला पहिल्या दिवशीच्या तुलनेत चौपट कमाई केली. चित्रपटाने विकेंडला रिलीजच्या तिसऱ्या दिवशी तब्बल 11.95 कोटींची कमाई केली आहे.

केजरीवालांच्या सांगण्यावरून पीएकडून मारहाण; आप खासदार स्वाती मालीवाल यांचा गंभीर आरोप

राजकुमारने साकारलेल्या अंध भूमिकेचं प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक होत आहे. त्याच्या या चित्रपटातील सर्वात पॉवर-पॅक परफॉर्मरने पुन्हा सिद्ध केले आहे की, तो चित्रपट उद्योगातील सर्वात अष्टपैलू कलाकारांपैकी एक आहे. अंध उद्योगपती श्रीकांत बोल्लाच्या भूमिकेत असलेल्या राजकुमार रावच सर्वत्र कौतुक होताना दिसतंय.

उद्धव ठाकरे मविआचे CM पदाचे उमेदवार? सूचक विधान करत म्हणाले, मी महाराष्ट्र…

अनेकांनी राजकुमार राव ने श्रीकांत उभेऊभ साकारला आहे असं देखील म्हटलं आहे.तुषार हिरानंदानी दिग्दर्शनात राजकुमार राव यांनी उद्योगपती श्रीकांत बोल्ला यांची निर्दोष भूमिका साकारणे हे त्यांच्या अतूट अभिनय कौशल्याचा पुरावा आहे. तो आउट-ऑफ-द-बॉक्स आणि मनोरंजक स्क्रिप्टसाठी पहिली पसंती का आहे हे देखील दाखवून जातो.

राजकुमार राव यांनी पडद्यावर वास्तविक जीवनातील व्यक्तिरेखा साकारण्याची ही पहिलीच वेळ नाही. ‘शाहिद’, ‘न्यूटन’, ‘ओमेर्टा’ आणि इतरांसह याआधी अनेक बायोपिकचा तो भाग आहे आणि प्रत्येक कामगिरीला प्रचंड प्रेम आणि समीक्षकांची प्रशंसा मिळाली आहे आणि आता‘ श्रीकांत’ ही त्याच्या प्रसिद्ध चित्रपटसृष्टीत आणखी एक भर पडली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज