Download App

हक्काच्या मैदानावर पाणी! 50 वर्षांत प्रथमच शरद पवारांच्या सभेचं मैदान बदललं

मागील पन्नास वर्षांत प्रथमच शरद पवार प्रचाराची सांगता सभा बारामतीमधील नेहमीच्या मैदानावर घेणार नाहीत. 

Image Credit: Letsupp

Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघातील हायहोल्टेज लढतीसाठीचा प्रचार आज थांबणार आहे. या मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद भावजयमध्येच लढत होत आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या माध्यमातून शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीही एक अदृश्य लढाई बारामतीत सुरू आहे. बारामतीत आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. यात एक गोष्ट पहिल्यांदाच घडत आहे ती म्हणजे मागील पन्नास वर्षांत प्रथमच शरद पवार प्रचाराची सांगता सभा नेहमीच्या मैदानावर घेणार नाहीत.

Baramati Lok Sabha : रोहित अन् पार्थ पवार एकाच वाहनात; बारामतीच्या हायहोल्टेज लढतीत नवं पॉलिटिक्स

मागील पाच दशकांच्या काळात शरद पवार ज्या मैदानावर सांगता सभा घ्यायचे यंदा तेच मैदान अजित पवार गटाने आधीच राखीव करून ठेवले आहे. या मैदानावर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा होणार आहे. बारामतीचं राजकारण पाहिलं तर सन 1967 पासून हे राजकारण शरद पवार यांच्या भोवतीच राहिलं आहे. सोसायटीची निवडणूक असो की लोकसभेची. शरद पवार सांगतील तोच उमेदवार असाच इथला शिरस्ता राहिला आहे.

शरद पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून प्रचाराच्या सांगता सभा बारामतीमधील मिशन बंगला नजीकच्या मैदानावर होत आली आहे. परंतु, आता प्रथमच हे  मैदान अजित पवार गटाने मिळवलं आहे. त्यामुळे यंदा शरद पवारांची सभा या मैदानावर होणार नाही. त्याऐवजी मोरगाव रस्त्यावरील लेंडीपट्टा येथे शरद पवार महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी आज दुपारी एक वाजता सांगता सभा घेणार आहेत.

Loksabha Election : शरद पवारांनी चारवेळा शिवसेना फोडली, दीपक केसरकरांचा हल्लाबोल

 

follow us

वेब स्टोरीज