Download App

भोर शहरात सुनेत्रा वहिनींचा प्रचार; फटाक्यांच्या आतषबाजीत नागरिकांनी केलं स्वागत

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार ठिकठिकाणी मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. आज त्यांनी भोर शहरात प्रचार दौरा केला.

Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघ देशभरात चर्चेत आहे. या मतदारसंघातील निवडणुकीत विजयाचा गुलाल कोण उधळणार याचं उत्तर ४ जूनला मिळेलचं. मात्र, त्याआधी प्रचार अन् राजकीय घडामोडींना वेग आला आहे. रणरणत्या उन्हातही प्रचाराने वेग घेतला आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार ठिकठिकाणी मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. आज त्यांनी भोर शहरात प्रचार दौरा केला. यावेळी शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भोर शहरातील मार्केटमध्ये प्रचार यात्रा सुरू असताना अनेक ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी करत नागरिकांनी मोठ्या उत्साहात सुनेत्रा पवारांचे स्वागत केले.

रोहित पवारांना धक्का! कट्टर समर्थक अजितदादांच्या राष्ट्रवादीत; बारामतीचं गणित बिघडणार?

बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार आहेत. या हायहोल्टेज लढतीकडे राज्याचं लक्ष आहे. शरद पवार आणि अजित पवार दोन्ही नेत्यांसाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे दोन्ही नेते मैदानात उतरले आहेत. प्रचार सभा, रॅली अन् मेळाव्यांनी मतदारसंघातील वातावरण ढवळून निघालं आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार प्रचार दौऱ्यांच्या माध्यमातून प्रचार करत आहेत.

आज सुनेत्रा पवार यांचा भोर शहरात प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता. दुपारच्या रणरणत्या उन्हात सुनेत्रा पवार पायी चालत नागरिकांच्या भेटी घेत होत्या. नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. भोर शहरातील मार्केटमध्ये प्रचार यात्रा सुरू असताना अनेक ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केलं. यावेळी परिसरातील दुकानदार व नागरिकांशी सुनेत्रा वहिनी यांनी संवाद साधला. महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बारामतीची निवडणूक भावनिक की विकासावर? ‘या’ फॅक्टर्समुळे हवा बदलणार?

follow us