पुण्यातील 35 मंडळांची मंगळवारी संयुक्त दहीहंडी; पुनीत बालन ग्रुपचा स्तुत्य उपक्रम

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे विश्वस्त पुनीत बालन यांनी मंडळांना एकत्र आणत या संयुक्त दहीहंडीचा निर्णय घेतला आहे.

Punit Balan 2

Punit Balan 2

Pune News : ‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून पुण्यातील ३५ नामांकित सार्वजनिक गणेश मंडळे (Pune News) एकत्र येऊन यावर्षी दहीहंडी उत्सव साजरा करणार आहेत. चौकाचौकात होणाऱ्या दहीहंडीमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि सुरक्षा व्यवस्था यामुळे पोलीस प्रशासनावर मोठा ताण येतो. हा ताण कमी करण्याच्या उद्देशाने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाने पुढाकार घेतला आहे. मंडळाचे उत्सव प्रमुख, विश्वस्त व युवा उद्योजक पुनीत बालन यांनी मंडळांना एकत्र आणत या संयुक्त दहीहंडीचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (27 ऑगस्ट) रोजी कसबा पेठेतील लाल महाल चौकात सार्वजनिक गणेश मंडळांचा संयुक्त दहीहंडी कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती पुनीत बालन यांनी दिली.

मागील काही वर्षांपासून ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि गुरुजी तालीम मंडळ एकत्र येऊन दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करतात. अल्पावधीतच या उपक्रमाला मोठी लोकप्रियता मिळाली. ठिकठिकाणी होणाऱ्या दहीहंडीच्या कार्यक्रमांमुळे वाहतूक कोंडी आणि प्रदुषणाची समस्या निर्माण होते. पोलीस प्रशासनावरचा ताण वाढतो. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी पुनित बालन यांनी संयुक्त दहिहंडी कार्यक्रमाची संकल्पना मांडली. त्यांच्या सामाजिक भावनेतून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मध्य शहरातील तब्बल ३५ सार्वजनिक मंडळांनी पाठिंबा दिला. सयुंक्त दहीहंडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे असे बालन म्हणाले.

Punit Balan : शिवमुद्रा ढोल ताशा पथक वाद्य पूजन सोहळा आणि सराव शुभारंभ

या उपक्रमात शहरातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, श्रीमंत पेशवे गणपती मंदिर, पुण्येश्वर महादेव मंदिर उत्सव समिती, नवग्रह मित्र मंडळ ट्रस्ट, श्री साने गुरुजी तरुण मंडळ, हुतात्मा भगतसिंग मित्र मंडळ, त्रिमूर्ती मित्र मंडळ (माणिक चौक), जनार्दन पवळे संघ, सुयोग मित्र मंडळ संयुक्त सिद्धीविनायक मित्र मंडळ, क्रांतीवीर राजगुरु मंडळ, श्री हनुमान मंडळ (अग्रवाल तालीम), क्रांतीरत्न चंद्रशेखर आझाद मंडळ.

जनता जनार्दन मंडळ, विजय अरुण मंडळ ट्रस्ट, व्यवहार आळी चौक मंडळ, श्री अभिमन्यू मंडळ ट्रस्ट, श्रीकृष्ण मित्र मंडळ, फणी आळी तालीम ट्रस्ट, तरूण शिवगणेश मित्र मंडळ ट्रस्ट, ऑस्कर मित्र मंडळ, प्रकाश मित्र मंडळ, लोखंडे तालीम संघ, त्वष्टा कासार समाज संस्था, भोईराज मित्र मंडळ, थोरले बाजीराव मित्र मंडळ, भरत मित्र मंडळ, प्रभात प्रतिष्ठान, लाल महाल नवरात्रौ उत्सव समिती, श्री कसबा गणपती शिवजयंती उत्सव मंडळ, सूर्योदय प्रतिष्ठान, खराडी, गणेश मित्र मंडळ (अलका चौक), श्री गजानन मंडळ (लक्ष्मी रोड) आणि गुरुदत्त मित्र मंडळ (मंडई) या मंडळाचा समावेश आहे.

Pune News : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

दरवर्षी शहरात अनेक सार्वजनिक मंडळांकडून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. मात्र, उत्सवाच्या या वाढत्या स्वरुपाने पोलीस प्रशासनावर सुरक्षा व्यवस्थेचा ताण पडतो. वाहतूक कोंडी होते आणि ध्वनी प्रदूषणही होते. त्यातून मार्ग काढून पोलिस बाधवांना सहकार्य करण्याच्या दृष्टीने आणि पुणेकरांना त्रास होऊ नये, यासाठी आम्ही यावर्षी संयुक्त दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. जवळपास सर्वच प्रमुख सार्वजनिक मंडळांनी या निर्णयाला पाठिंबा देत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्या सर्व मंडळांचे आम्ही मनापासून आभारी आहोत, असे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी सांगितले.

Exit mobile version