Download App

धंगेकरांचं खळबळजनक ट्विट! पबमधील फोटो शेअर करत म्हणाले, “४८ तासांच्या आत…”

काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी एक फोटो ट्विट करत या फोटोतील पोलिसांव कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Pune Porsche Car Accident : राज्यात पुण्यातील अपघाताची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपांनंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून पब्स आणि हॉटेल्सकडून हप्ते गोळा केले जात आहेत असा दावा त्यांनी केला आहे. यानंतर त्यांनी एक फोटो ट्विट केला आहे. फोटोतील पोलिसांवर कारवाई करून निलंबित करा अन्यथा ४८ तासांत आम्ही या पोलिसांचे व्हिडिओ ट्विट करू, असा इशारा धंगेकर यांनी दिला आहे.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो, कल्याणीनगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका होऊन देखील पुणे शहराच पोलीस कमिश्नरांना अजूनही कुणी दोषी आहेत असं वाटत नाही. अर्थात जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय तो कसा कुणावर कारवाई करणार..? असो, आजपासून मी तुम्हाला दररोज एका पोलीस स्टेशनवर सुरू असलेल्या गैरकारभाराची कथा पाठवणार आहे.

Pune Accident : “ब्लड रिपोर्टची गरज नाही, आमच्याकडे त्याहून मोठा पुरावा”: अमितेश कुमार

मुंढवा पोलीस स्टेशन फक्त तीन कर्मचारी चालवतात. येथील कॉन्स्टेबल पब्स, हॉटेल येथून हप्ते गोळा करण्याचे काम करतात असा आरोप धंगेकरांनी या ट्विटमध्ये केला आहे. यासोबतच त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत वसुली कॉन्स्टेबल पबध्ये पार्टी करताना दिसत असल्याचे धंगेकरांनी म्हटलं आहे. आम्हा पुणेकरांच्या वतीने आपणास विनंती आहे की पुणे बिघडवणाऱ्या या पोलीस कॉन्स्टेबलची तातडीने चौकशी करून निलंबित करा. अन्यथा, ४८ तासांत यांचे इतर व्हिडिओ देखील ट्विट करण्यात येतील असा इशारा धंगेकरांनी दिला आहे.

follow us