Download App

पुणेकरांनो सावधान..! आज जिल्ह्यात अवकाळी बरसणार; हवामानाचा अंदाज काय?

आजही अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज पुणे जिल्ह्यात वादळी पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट होईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Weather Update : राज्यात कडाक्याच्या उन्हाळ्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) तडाखा दिला आहे. काल दुपारी नगर, पुणे, जालना, छत्रपती संभाजीनगरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Weather Update) दाणादाण उडवली. या पावसाने तापमानात घट होऊन नागरिकांना दिलासा मिळाला. परंतु, हाच पाऊस फळबागांसाठी मारक ठरला. या पावसाने शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठे नुकसान झाले. निवडणुकीच्या प्रचारातही या पावसाने व्यत्यत आणला. राजकीय सभा रद्द कराव्या लागल्या. दरम्यान, आजही अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज पुणे जिल्ह्यात वादळी पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट होईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पुणे-नगरला ‘अवकाळी’चा तडाखा; राजकीय सभांना बसला फटका

राज्यात काल ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला. नागपूर,गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नांदेड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. नगर जिल्ह्यालाही तडाखा बसला. हा पाऊस फळबागांना मारक ठरला. अनेक ठिकाणी फळबागांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. त्यानंतर आजही राज्यात ठिकठिकाणी पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पुण्याला ऑरेंज, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

पुण्यात आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. त्यामुळे हवामान विभागाने पुण्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच नगर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी धुळे, नंदूरबार, नाशिक, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पुढील तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूरमध्ये पुढील चार ते पाच दिवस जोरदार वाऱ्यांसह पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कडाक्याच्या उन्हाने पोळून निघालेल्या पुणे आणि नगर शहराला काल अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. या पावसाने तापमानात अचानक घट झाली. उन्हाने होरपळणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला. पण हा पाऊस फळबागांना मारक ठरला.

उन्हाळ्यात पाऊस धारा! राज्यात पुढील चार दिवस अवकाळीचे; ‘या’ भागात अलर्ट जारी  

follow us

वेब स्टोरीज