Amabadas Danve : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. दोन दिवसांपासून जरांगेंचं उपोषण सुरु असून राज्यातील मराठा तरुणांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.
निळवंडे प्रकल्प; दुष्काळी भाग होणार सुजलाम सुफलाम; 182 गावे ओलिताखाली येणार
मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण होत नसल्याने मराठा बांधवांकडून राजकीय नेत्यांना गावात प्रवेश नाकारत असल्याचं दिसून येत आहे. नांदेडमध्ये खासदार प्रताप चिखलीकर पाटलांच्या गाड्या फोडल्यानंतर आता पुण्यातील पिंपरीत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे(Amabadas Danve) यांच्या गाडीच्या ताफ्यावर बांगड्या फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
‘सरकारने विश्वास दिला होता, जरांगेंचा दोष नाही’; शरद पवारांनी उपोषणावर मौन सोडलं
पुण्यातील पिंपरी परिसरातून ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जात होते. त्याचवेळी मराठा क्रांती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यावर बांगड्या फेकण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून मराठा आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
BMW X4 : बीएमडब्ल्यूची नवीन लक्झरी कार लॉन्च; किती आहे किंमत आहे? जाणून घ्या…
नांदेडमध्ये भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या ताफ्यातील गाड्या फोडल्याची घटना घडली. खासदार प्रतापसिंह पाटील चिखलीकर हे माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर तेलंग यांना भेटण्यासाठई अंबुलगा गावात गेले होते. त्याचवेळी अंबुलगा गावातील मराठा तरुण आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
स्वतःती गाडी जाळली, सदावर्तेंची फोडली, तुरुंगातही गेला : मराठा आरक्षण आंदोलनाचा ‘साबळे पॅटर्न’
चिखलीकरांच्या गाड्यांचा ताफा गावात येताच तुम्ही आम्हाला आरक्षण दिल्याशिवाय आमच्या गावांत पाय ठेवू नका, असं म्हणत मराठा आंदोलकांनी खासदार चिखलीकरांना घेरा घातला होता. या संवादादरम्यान एक मराठा लाख मराठा, मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, अशी जोरदार घोषणाजीदेखील संतप्त झालेल्या मराठा तरुणांकडून देण्यात आली.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून मराठा समाज पेटून उठला आहे. जालन्यातील अंतरवली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं दोन दिवसांपासून उपोषण सुरु आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी शिंदे सरकारकडून समिती गठीत करण्यात आली असून अद्याप या समितीने सरकारकडे अहवाल सादर केलेला नाही. अशातच आता विविध गावांत राजकीय नेत्यांना प्रवेश नाकारण्यात येत असून गाड्या फोडण्यात येत असल्याची परिस्थिती दिसून येत आहे.