Weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढला असून अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस (Weather Update) होत आहे. पुढील काही दिवसांत पावसाची अशीच शक्यता राहणार आहे. हवामान विभागाने पावसाचा (Heavy Rain) इशारा दिला आहे. मुंबईला तर पावसाने झोडपून (Mumbai Rains) काढले आहे. मुंबईसह किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीतही आज (Delhi Rains) सकाळीच पावसाने हजेरी लावल्याने दिल्लीकर सुखावले आहेत. पुढील चार दिवस दिल्लीत जोरदार पाऊस (Rain Alert) होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात पावसाची परिस्थिती कायम राहणार असून मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाने रायगड आणि सातारा या दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. या दोन्ही जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिक, पुणे आणि नगर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम घाटात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल अशी शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, जळगाव विदर्भातील नागपूर, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत पावसाची शक्यता राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यांतील धरणे ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर आहेत.
मुंबईत जोरदार पाऊस; रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम, Mlc मतदानाची वेळ वाढवण्याची मागणी फेटाळली
दरम्यान, राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मागील पंधरा दिवसात राज्यात अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र या आठवड्यात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या सरासरीचा पावसाचा आकडा पार झाला आहे. मुंबईतील पावसानं सरासरी हजार मिमीचा टप्पा ओलांडला आहे. तर, जुलै महिन्याची सरासरी अवघ्या 14 दिवसांत पूर्ण करण्यात आली आहे. जुलै मध्यपर्यंतच पावसानं जुलै महिन्याच्या सरासरी एवढ्या पावसाचा टप्पा पार केला आहे.