Download App

‘मुरली, मीटिंग पोस्टपोन हो गई है पुणे जाके आओ’; मोहोळांनी सांगितला अमित शाहंचा किस्सा

Muralidhar Mohol शपथविधी सोहळ्यानंतर मोहोळ पुण्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी मोदी आणि अमित शाह यांचे काही किस्से सांगितले.

Image Credit: letsupp

Muralidhar Mohol Tell story of Meeting With Amit Shah : देशात एनडीएचे सरकार (NDA Govt) स्थापन झाले असून नरेंद्र मोदी (Narendra Modi) 9 जून ला तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ ( Oath Ceremony ) घेतली. त्यामध्ये मंत्रिपद मिळालेल्या खासदारांमध्ये राज्यातील पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळांचा ( Muralidhar Mohol ) समावेश आहे.

पराभव माझा, पण नाचक्की भाजप अन् चव्हाणांची, प्रतापराव चिखलीकरांची नाराजी जाहीर…

यामध्ये त्यांना नागरी उड्डाण खात्याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मोहोळ नुकतेच पुण्यात दाखल झाले आहे. यावेळी त्यांनी दिल्लीमध्ये शपथविधीच्या दरम्यान झालेल्या बैठकीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांच्याशी झालेल्या भेटीतील काही किस्से सांगितले.

शिखर बॅंक : क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतला? अण्णा हजारे म्हणतात, ‘मला कल्पनाच नाही…’

यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले की शपथविधीनंतर मला दीड दिवसाची सुट्टी मिळाली आहे. तसेच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आलो असलो तरी मला नऊ वाजेपर्यंत माहिती नव्हतं की, मला मंत्रिपद मिळेल मात्र मी महाराष्ट्र सदनमध्ये आराम करत असताना मला अचानक फोन आला. त्यामुळे आता मंत्री म्हणून मिळालेली जबाबदारी पार पाडेल. तर शपथविधी आधीच्या पंतप्रधान मोदी यांनी बैठकीमध्ये आपल्या पाठीवर थाप देत ‘कसे आहात पुणेकर’ असं आवर्जून विचारलं असल्याचं मोहोळ यांनी सांगितलं.

तर गृहमंत्री अमित शाह हे आम्हाला कडक हेड मास्टर मिळाले आहेत. तसेच त्यांनी माझी चांगली विचारपूस केली. पुण्याला जाऊन आल्याचं त्यांनी विचारलं. म्हणाले, मुरली आप पुणे गये नहीं हो क्या? मीटिंग पोस्टपोन हो गई है आप जाके आओ. असं म्हणत त्यांनी आपल्याला पुण्याला जाऊन येण्याबद्दल सांगितलं. असं मोहोळ यांनी सांगितलं.

follow us

वेब स्टोरीज