Download App

जन्म दाखल्यावर काय लिहिले, ते समाजाला कळू द्या, नामदेव जाधवांचे पुन्हा पवारांना चँलेज

  • Written By: Last Updated:

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या जन्म दाखल्यावरून ते ओबीसी असल्याचा दावा केला जात आहे.यावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत.आज शरद पवार यांनीच आपल्या जन्म दाखल्याबाबत भूमिका मांडली आहे. जन्माने जी प्रत्येकाची जात असते ती लपवू शकत नाही.सर्व जगाला माझी जात कोणती हे माहीत आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे. त्यावरून राजमाता जिजाऊंचे वंशज व लेखक नामदेव जाधव (Namdev Jadhav) यांनी शरद पवार व त्यांच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा आव्हान दिले आहे.

Virendra Pradhan: सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाने व्यक्त केली खंत; म्हणाले, ‘मालिका अर्ध्यावर…’

पुण्यात माध्यमांशी बोलताना नामदेव जाधव म्हणाले, आमचा ठोस मुद्दा हा जात नाही तर आरक्षणाचा आहे. पहिला मुद्दा २३ मार्च १९९४ च्या जीआरचा आहे.या जीआरमधून १६ टक्के मराठा आरक्षण ओबीसींना दिले गेले आहे. त्याचा जाब आम्ही शरद पवारांना विचारत आहे. मराठा समाजातील पाच कोटी मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे.माझे शरद पवारांवर व्यक्तिगत किंवा खासगी आरोप नाहीत. ते सार्वजनिक हिताचे आहेत. हा निर्णयझाला त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते.छगन भुजबळ हे आपल्या जातीबाबत ठाम भूमिका घेतात. इतर नेतेही आपल्या जातीबाबत ठाम भूमिका घेतला. परंतु शरद पवार कधीच आपल्या जातीबाबत ठाम भूमिका घेत नाहीत. ते कधी स्पष्ट बोलत नाही, असा निशाणा जाधव यांनी साधला आहे.


Sharad Pawar : माझी जात जगाला माहिती आहे; मराठा-ओबीसी वादावर पवारांचे सडेतोड उत्तर

शरद पवार यांच्या कार्यकाळात जीआर काढल्यामुळे मराठा समाजाच्या दोन पिढ्या बर्बाद झाल्या आहेत. प्रत्येक नेत्याला जातीचा अभिमान असते.परंतु ओबीसीची नेहमीत ते बाजू घेतात. त्यामुळे ओबीसीचे ते नेते आहेत का ? याबाबत त्यांना विचारणार आहेत.
तुम्ही सर्वांना न्याय देत सुटले आहेत. पण मराठा समाजाला डावलत आहात. तुम्हाला मराठा समाजाबाबत काय आकस आहे हे एकदा स्पष्टपणे सांगावे.माझी जात सर्वांना माहिती आहे. सांगा मग जन्म दाखल्यावर काय लिहिले आहे ते.समाजाला, देशातील नागरिकांना ते पाहिला आवडेल, असे चँलेजच जाधव यांनी दिले आहे.

कार्यकर्त्यांचाही घेतला समाचार

शरद पवार यांच्या दाखल्यावरून राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या काही पदाधिकारी यांनी नामदेव जाधव यांच्यावर टीका केली. तसेच शरद पवारांचा एक दाखलाही जगजाहीर केला. त्यावरून जाधवांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाचाही समाचार घेतला आहे. साहेबांचा दाखला काढताना कार्यकर्त्यांनाही विचार केला पाहिजे. आलतू -फालतू दाखले काढून साहेबांची बदनामी करू नका. कार्यकर्त्यांनी काढलेल्या दाखला इंग्लिशमध्ये आहे. एसएससी बोर्डाची १९६६ स्थापना आहे. पवारांच्या दाखल्यावर १९५८ लिहिले आहे. त्यांचे खोटे कागदपत्रे काढली जात आहे. असा पराक्रम करणाऱ्यांवर शरद पवारांनी कारवाई केली पाहिजे, असेही जाधव यांनी म्हटले आहे.

Tags

follow us