Z+ सुरक्षा द्या, मग दाखवतो! ‘धमक्या’ देणाऱ्यांना अन् ‘तोतया’ म्हणणाऱ्यांना नामदेव जाधवांचे खुले आव्हान

Z+ सुरक्षा द्या, मग दाखवतो! ‘धमक्या’ देणाऱ्यांना अन् ‘तोतया’ म्हणणाऱ्यांना नामदेव जाधवांचे खुले आव्हान

पुणे : तीन पोलीस माझे आणि माझ्या कुटुंबाचे संरक्षण करू शकणार नाहीत. मला झेड प्लस किंवा वाय प्लस सुरक्षा द्या. एकदा ती सुरक्षा द्या आणि मग बघू मैदानामध्ये समोरासमोर काय होते ते बघू, असे म्हणत लेखक आणि राजमाता जिजाऊ यांचे वंशज म्हटले जाणाऱ्या नामदेव जाधव (Namdeo Jadhav) यांनी त्यांना धमक्या देणाऱ्या आणि त्यांना तोतया म्हणणाऱ्यांना खुले आव्हान दिले आहे. (Namdev Jadhav’s open challenge to those who give ‘threats’ and those who call them ‘fake’)

नामदेव जाधव यांनी मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनीच मुख्यमंत्री असताना मराठ्यांचे आरक्षण घालवले. तेच मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत, असा आरोप त्यांनी केला होता. इतकेच नाही तर शरद पवार हे स्वतः ओबीसी आहेत. त्यांना आम्ही मराठ्यांचे नेते समजत होतो, पण ते ओबीसी आहेत, असा दावाही जाधव यांनी केला होता.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नामदेव जाधवांविरोधात आक्रमक झाला आहे. जाधव यांच्याविरोधात लोणीकंद पोलीस स्थानकात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर आता नामदेव जाधव यांचा सिंदखेडच्या लखोजीराव जाधव आणि माँ जिजाऊंशी कुठलाही संबंध नाही. ते तोतया आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी करत सिंदखेड राजा येथील लखोजीराव जाधव यांचे वंशज राजे गोपाल भगवानराव जाधव यांनीही नामदेव जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर नामदेव जाधव बोलत होते.

काय म्हणाले नामदेव जाधव?

मी कधी कोणाच्या विरोधात बोलत नाही. पण, ज्यावेळी माझ्या पाच कोटी मराठा बांधवांचा जगण्या-मरण्याचा प्रश्न माझ्यासमोर आला त्यावेळी मी माझा जो काही अभ्यास आहे तो पणाला लावला आणि 23 मार्च 1994 हा दिवस काळा दिवस आहे असे जाहीरपणे म्हटले. त्या जीआरची प्रत सुद्धा मी नंतर फेसबुकवरती टाकली. जे धाडस गेल्या पन्नास वर्षात महाराष्ट्रामध्ये कोणी केले नव्हते ते धाडस राजमाता जिजाऊ यांचे 14 वंशज नामदेवराव जाधव म्हणून मी केले आणि आपल्या समोर हे सगळे मांडले.

शरद पवार ओबीसींचेच नेते :

आता या मुद्द्याला काहीच उत्तर सापडत नाही म्हणून लोक काय काय उद्योग करत आहेत. कथित जाणता राजाच्या व्यथित नातवाने दुपारी काहीतरी प्रयोग केले. सविस्तर त्यावर मी सविस्तर बोलणारच. पण कितीही मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न कोणी केला तरी आपण मात्र 23 मार्च 1994 काळा दिवस आणि मराठ्यांचा आरक्षण ओबीसींना कसे दिले गेले यावर लक्ष देऊ. जर शरद पवार हे मराठा असते तर त्यांनी मराठ्यांवरती हा न्याय होऊ दिला नसता, ज्या अर्थी त्यांनी मराठ्यांचा आरक्षण ओबीसींच्या घशात घातलं त्याचा अर्थ सरळ सरळ स्पष्ट आहे की शरद पवार हे ओबीसीच नेते आहेत.

शरद पवारांचा खोटा जातीचा दाखला व्हायरल, रोहित पवारांचा भाजपवर गंभीर आरोप

काल जे रोहित दादांनी सिंदखेड राजाला जाऊन काय प्रताप केले, तिथं खरंतर तुम्ही आतापर्यंत अनेक वेळा जायला पाहिजे होते. सिंदखेडराजाचा विकास करायला पाहिजे होता. पण तुम्ही वेगळ्याच कारणानिमित्त गेले आणि एक चुकीचे काम करायचा तुम्ही प्रयत्न केला. त्याच्यावर मी एक दोन चार दिवसांमध्ये सविस्तर बोलणार आहे. पहिले जो 23 मार्च 1994 चा जीआर मी म्हणतोय की ज्याच्या आधारे रातोरात मराठ्यांचे आरक्षण ओबीसींना दिले गेले त्याच्याबद्दलची श्वेतपत्रिका काढा हीच माझी पाच कोटी मराठा बांधवांच्या विकासासाठी मागणी आहे आणि त्या पाच कोटी लोकांच्या भविष्याची राख रांगोळी कशामुळे झाली हे महाराष्ट्राला कळू द्या एवढेच माझे मत आहे.

Z+ सुरक्षा द्या, मग दाखवतो!

बाकीचे जे मुद्दे आहेत, मी कोणाचा वंशज, कितवा वंशज, कुठून वंशज, माझं कर्तृत्व काय, माझे चारित्र्य काय, माझे पराक्रम काय, माझं शौर्य काय, मी किती अटकेपार शिकागोला झेंडे लावले, त्याच्यावर आपण सविस्तर सात आठ दिवसात बोलूयात. फक्त एवढ्या प्रश्नाचे मात्र उत्तर द्या आणि कृपा करून माझ्या जीविताला धोका निर्माण होईल असे कोणतेही पाऊल तुम्ही या वयामध्ये चुकून उचलू नका. अन्यथा आता सरळ सरळ लक्षात घ्या, मी जाधवांचाच वारस असल्यामुळे मी कोणालाही घाबरत नव्हतो घाबरत नाही आणि घाबरणार नाही.

मला धमक्यांचे अनेक फोन आलेत, मला कल्पना आहे. माझ्या जीवितला धोका आहे, याची मला कल्पना आहे. माझ्या कुटुंबाला सुद्धा दहशतीच्या छायेमध्ये तुम्ही ठेवायचा प्रयत्न करताय, हेही मला माहिती आहे. महाराष्ट्र सरकारने मला प्रोटेक्शन दिलेले आहे, हेही तुम्हाला सांगतो. पण माझा असं म्हणणे की तीन पोलीस माझं संरक्षण, माझ्या कुटुंबाचे संरक्षण करू शकणार नाहीत. मला झेड प्लस किंवा वाय प्लस सेक्युरिटी मिळाली पाहिजे. एकदा ती सेक्युरिटी मला द्या आणि मग बघू मैदानामध्ये समोरासमोर काय होते.

Sharad Pawar यांच्यावर आरोप करणाऱ्या नामदेव जाधवांविरोधात लखोजीराव जाधवांचे वंशज मैदानात

ते फक्त तुम्ही मुद्दे डायव्हर्ट करायच्या भानगडी करू नका. मुद्दा एकच आहे या गोरगरिबांच्या ताटामध्ये त्यांच्या अन्नात तुम्ही माती कालवू नका. पाच कोटी मराठ्यांच्या ह्या मुलांचे भविष्य घडलं पाहिजे याच्यासाठी आतापर्यंत जर काही नाही करता आलं याच्या पुढे तरी करायचा प्रयत्न करा आणि जरंगे पाटलांच्या माध्यमातून हा न्याय मिळणार असेल तर किमान त्यांना खंबीरपणे साथ देणाऱ्या माणसांच्या बाबतीत तुम्ही अशा प्रकारची भूमिका घेऊ नका आणि आणखी संशयाचे गोंधळ निर्माण होईल असे करू नका. मराठ्यांच्या ह्या पाच कोटी मुलांचे भले होईल याच्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यायला पाहिजे आणि बाकीच्या मराठा आमदारांनी सुद्धा घ्यायला पाहिजे. पण हे कोणीच बोलत नाही आणि म्हणून मला हे बोलावे लागले.

मी जिजाऊंचा वंशज असल्याचा हाच मोठा पुरावा :

माझा लढा माझ्या व्यक्तिगत नाही या पाच कोटी मराठ्यांची मी बाजू घेऊन मैदानात उतरलोय. आजपर्यंत कोणी जी हिम्मत केली नाही ती मी हिम्मत केलेली आहे आणि हाच एक मोठा पुरावा आहे की मी जिजाऊंचा वंशज आहे. पण माझी वंशावळ आणि हे सगळं नंतर आपण बघूच त्याच्यासाठी आपण स्वतंत्र परिसंवाद ठेवू. मी तयारच आहे माझ्याकडे सगळी यंत्रणा आहे. म्हणून मी सांगतो मी तयार आहे. फक्त तुम्ही हे 23 मार्च 1994 चा जीआर त्याच्याबद्दलची श्वेतपत्रिका आणि पाच कोटी मराठ्यांच्या मातीत घातलेल्या भविष्याला परत सुवर्ण दिवस कसे येतील एवढेच बोला आणि पाच कोटी मराठ्यांना तुम्ही असेच ठामपणे माझ्या मागे उभे राहिले तर लक्षात घ्या आपण आपले मराठा आरक्षणाचे योद्धा संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांचे आणखी हात बळकट करूया आणि आपला गेल्या पन्नास वर्षे झालेला अन्याय आपण पुढच्या 25 वर्षात तो सगळा बॅकलॉग भरून काढूया, असाही इरादा त्यांनी व्यक्त केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube