सभागृहाबाहेरील आरोपांवर राहुल नार्वेकरांचं प्रत्युत्तर; म्हणाले, ‘माझ्या निर्णयावर..,’

सभागृहाबाहेरील आरोपांवर राहुल नार्वेकरांचं प्रत्युत्तर; म्हणाले, ‘माझ्या निर्णयावर..,’

Mla Disqualification : शिवसेनेत असताना एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यात चांगलच वातावारण ढवळून निघाल्याचं पाहायला मिळालं. शिवेसेनेचे दोन गट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटामध्ये जोरदार चुरस सुरु झाली आहे. आमदार अपात्रतेबाबत (MLA Disqualification ) अंतिम निर्णय झालेला नसून, सर्वांचे लक्ष विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या निर्णयाकडे लागले आहे. अशातच आता विरोधकांकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यावरुन राहुल नार्वेकरांनी विरोधकांच्या आरोपांना एका वाक्यातच उत्तर दिल्याचं पाहायला मिळालंय.

धक्कादायक! नांदेड रुग्णालयात मृत्यूचं तांडव सुरूच; 24 तासात 6 नवजात बालकांसह 15 जण दगावले

विधीमंडळाच्या सभागृहाबाहेर विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांमुळे माझ्या निर्णयावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं मोठं विधान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं आहे. तसेच निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असून त्यांच्या कार्यकपद्धतीवर संशय घ्यायची गरज नाही. कायदा पाळूनच निर्णय घेतले जाणार असल्याचंही नार्वेकरांनी यावेळी ठणकावून सांगितलं आहे.

Israel Hamas War : परिस्थिती चिघळली! हमासनंतर आता लेबनॉनचाही इस्त्रायलवर हल्ला

तसेच अपात्र आमदारांप्रकरणी ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिक दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी याचिका दाखल असल्याने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणारच असून विधींमंडळ, न्यायव्यस्थेवर संविधानिक शिस्त पाळूनच निर्णय घेणार असून कोणाचाही कोणावर दबाव नसल्याचं नार्वेकरांनी स्पष्ट केलं आहे.

आमदार निघून गेले म्हणजे जनाधर गेला असा गैरसमज करू नका; जयंत पाटलांचा बावनकुळेंना इशारा

सर्वोच्च न्यायालयात जी याचिका दाखल केली आहे, त्यावर सर्वोच्च न्यायालय निर्णय घेणार आहे, एखादा विधीमंडळाचा निर्णय घटनाबाह्य असेल तर त्यामध्ये हस्तक्षेप होऊ शकतो पण इतर गोष्टींमध्ये हस्तक्षेप होत नाही, सभागृहाच्या बाहेरून होणाऱ्या आरोपांवर मी कधीच प्रभावित होत नाही, त्यांच्या आरोपांचा माझ्या निर्णयावर कोणताही परिणाम होत नसल्याचंही राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.

एकीकडे अपात्र आमदारांप्रकरणी सुनावणी सुरु असून या सुनावणीमध्ये चालढकल करण्याच प्रकार सुरु असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे, अशातच ज्या लोकांकडून आरोप होत आहे, त्यांना संविधान आणि कायद्याची माहिती नसल्याचंही ते म्हणाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरचे 16 आमदार पात्र होणार की अपात्र याचा निर्णय आणखी लांबणीवर गेला आहे. कारण, आता या प्रकरणाची सुनावणी आणखी महिनाभर पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या 9 ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी होणार होती. मात्र, आता ही सुनावणी 3 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. सुनावणी पुढे ढकलण्याची ही चौथी वेळ आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube