Download App

जुन्नरमध्ये शरद पवार गटाला खिंडार; अतुल बेनकेंचा रामराम, अजित पवारांचा धरला हात

Atul Benke News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे 40 वर्षांपासून असलेले खंदे समर्थक आमदार अतुल बेनके (Atul Benke News) यांनी शरद पवार गटाला रामराम ठोकला आहे. अतुल बेनके यांनी आता पुढील काळात अजित पवारांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात शरद पवार यांना मोठा असल्याचं मानलं जात आहे.

शेअर बाजारात मोठी पडझड; प्रॉफिट बुकिंगचा फटका, ‘या’ शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण

जुन्नरमध्ये अतुल बेनके यांचे वडिल वल्लभशेठ बेनके यांनी आपलं राजकीय जीवनात पदार्पण केलं होतं. वल्लभशेठ यांनी तब्बल चारवेळा आमदार होण्याचा मान मिळवला होता. त्यानंतर अतुल बेनके यांनी वडिलांच्या पाठोपाठ जम बसवला. अतुल बेनके यांनी शरद पवारांसोबत राहुन राजकारणात चांगला जम बसवल्यानंतर आता साथ सोडली आहे. त्याचाच परिणाम म्हणून शरद पवार गटासोबत असलेले संबंध मिटणार आहे.

‘अपघातात जीव गेला असता, पण केवळ लोकांच्या आशिर्वादामुळे वाचले’; अपघातानंतर ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडल्यानंतर अनेक अफरातफर झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर काही आमदारांनी शरद पवारांचं नेतृत्व सोडून अजित पवार यांचं नेतृत्व मान्य केलं. अशातच काही दिवसांपूर्वीच शिरुर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात महायुतीचा उमेदवार निवडून आणणार असल्याचं खुलं आव्हानच अमोल कोल्हे यांना अजित पवार यांनी दिलं होतं. त्यामुळे आता पुण्यात अजित पवार गटाकडून आपली ताकद वाढवण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.

‘काहीही हरकत नाही’: मराठा-ओबीसी वादात मध्यस्थी करण्याची आंबेडकरांची ऑफर जरांगेंनी स्वीकारली

राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर अनेक आमदारांनी अजित पवार गटात उडी घेतली. मात्र, बेनके यांनी फुटीनंतर तत्काळ आपली भूमिका स्पष्ट केली नाही अनेक दिवस त्यांनी आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आल्याने अखेर अतुल बेनके यांनी निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुका समोर ठेऊन शरद पवार गटात जायचं की अजित पवार गटात? हा मोठा पेच बेनके यांच्यासमोर होता. अखेर आज अजित पवारांच्या दौऱ्यात त्यांनी अजित पवारांचा हात धरला आहे.

follow us