‘अपघातात जीव गेला असता, पण केवळ लोकांच्या आशिर्वादामुळे वाचले’; अपघातानंतर ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया

  • Written By: Published:
‘अपघातात जीव गेला असता, पण केवळ लोकांच्या आशिर्वादामुळे वाचले’; अपघातानंतर ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया

Mamata Banerjee Car Accident : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या गाडीला बुधवारी (दि. २४ जानेवारी) अपघात झाला. बंगालच्या बर्दमान जिल्ह्यातील एका कार्यक्रमातून त्या कलकत्याला परतत असतांना त्यांच्या कारला अपघात झाला. ममता बॅनर्जींची कार दुसऱ्या वाहनाला धडकणार होती. ही धडक टाळण्यासाठी चालकाने अचानक ब्रेक लावल्याने कारमधून प्रवास करणाऱ्या ममता बॅनर्जी जखमी झाल्या. दरम्यान, या अपघातानंतर ममता बॅनर्जींनी प्रतिक्रिया दिली आहे.

कथित खिचडी घोटाळा प्रकरण : संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांना ईडीचं समन्स 

अपघातानंतरमाध्यमांशी संवाद साधतांना  ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी बर्दमानहून परतत होते. या दरम्यान माझी कार दुसऱ्या कारला धडकणार होती. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखून ब्रेक मारला. गाडी अचानक थांबल्याने माझ्या डोक्याला मार लागला आणि रक्तस्त्राव सुरू झाला.


बॅनर्जी पुढे म्हणाले, जर ड्रायव्हरने ब्रेक लावला नसता तर माझी कार दुसऱ्या कारला धडकली असती. अपघाताच्या वेळी माझ्या कारची खिडकी उघडी होती. ती बंद असती तर अपघात आणखी भयानक झाला असता आणि काच तुटून माझ्या अंगावर आली असती. त्यामुळं मी गंभीर जखमी झाले असते. मला जीव गमवावा लागला असता.

‘जागावाटपाचं टेन्शन घेऊ नका, कामाला लागा’; नाना पटोलेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र 

या अपघातात माझा जीवही गेला असता. पण, केवळ लोकांच्या आशिर्वादामुळं आज माझा जीव वाचला आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. यामागे घातपात किंवा षडयंत्र होतं का, याचीही पोलीस चौकशी करणार आहेत.

सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ममता बॅनर्जी राज्याच्या पूर्व आणि पश्चिम बर्दवान जिल्ह्यात पोहोचल्या होत्या. त्यानंतर परतत असतांना त्यांच्या कारला अपघात झाला. कमी दृश्यमानता आणि रस्त्यावरील धुके यामुळे हा अपघात झाला. गाडीला ब्रेक लागल्याने मुख्यमंत्र्यांच्या डोक्याला दुखापत झाली. दरम्यान, पीटीआयने अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, ममता बॅनर्जी ड्रायव्हरच्या शेजारी पुढच्या सीटवर बसल्या होत्या. त्यांचे डोकं समोरच्या काचेवर आदळल्याने त्या जखमी झाल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज