‘जागावाटपाचं टेन्शन घेऊ नका, कामाला लागा’; नाना पटोलेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

‘जागावाटपाचं टेन्शन घेऊ नका, कामाला लागा’; नाना पटोलेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

Nana Patole News : जागावाटपाचं टेन्शन घेऊ नका, तुम्ही कामाला लागा, असा कानमंत्रच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. भिवंडीत आज काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात नाना पटोले बोलत होते. यावेळी काँग्रेसचे राज्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागावाटपाटपाच्या मुद्द्यावर चर्चा सुरु आहे. यावर नाना पटोले थेट बोलले आहेत.

Budget 2024 : आयकरात सूट मिळणार…सर्वेक्षणात नेमकं काय म्हटलं?

नाना पटोले म्हणाले, भिवंडीच्या जागेवर दावा करणाऱ्यांनाही त्रास आहे. भिवंडी हे आपलंच राहिलेलं आहे. उद्या परवाच्या बैठकीत भिवंडीबाबत चर्चा होणार आहे. तुम्ही तुमचं काम करा, आमचं काम आम्हाला करु द्या, जागावाटपाबाबत टेन्शन घेऊ नका आजपासून कामाला लागा जागावाटपावर चर्चा करण्याचं काम आमचं असून
राहुल गांधींना दिल्लीतलं प्रतिनिधीत्व करणयासाठी आपल्याला पाठवायचं असल्याचा कानमंत्रच नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

अखेर आदिती तटकरेंनी रायगड मिळविलेच; आता गोगावलेंच्या डोळ्यासमोरच फडकविणार ‘झेंडा’

आरक्षण व्यवस्था संपत चाललीयं……
देशात आणि राज्यात आरक्षण व्यवस्था संपत चालली असून शेतकरी, बेरोजगारीदेखील संपत चालली आहे. नोकर भरतीच्या नावाखाली सरकारने उमेदवारांकडून करोडो रुपयांची फी लुटली आहे. नोकर भरतीतही सरकारमध्ये मोठ्या भ्रष्टाचार सुरु असल्याचं आपल्या सरकारच्या काळात आपण उमेदवारांना 500 रुपये भरुन राज्य सरकारच्या सर्व भरतीमध्ये अर्ज भरण्याची सुविधा करुन देणार असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं.

ममतांवर आमचं प्रचंड प्रेम; इंडिया आघाडीतील फारकतीनंतर सुप्रिया सुळेंचा वेगळाच दावा

दरम्यान, देशात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. अशातच आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जागावाटपाबाबत चर्चा सुरु झाली आहे. महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांच्या जागावाटपासाठी मॅरेथॉन बैठका सुरु झाल्या आहेत. अशातच आता नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube