VIDEO : NCP च्या कार्यक्रमात ‘अजितदादां’ऐवजी ‘महेशदादां’च्या घोषणा; चाकणकरांनी भाषण थांबवलं

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यक्रमात ‘एकच वादा अजितदादा’ऐवजी ‘एकच वादा महेशदादा’ अशी घोषणा ऐकायला मिळाल्या आहेत. पुण्यातील मोशीमध्ये आयोजित राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात हा प्रकार घडला आहे. कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांचं (Rupali Chakankar) भाषण सुरु असतानाच काही जणांकडून अशी घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात एकच वादा अजितदादा अशा घोषणा ऐकायला मिळतात पण या […]

NCP Pune Ajitdada

NCP Pune Ajitdada

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यक्रमात ‘एकच वादा अजितदादा’ऐवजी ‘एकच वादा महेशदादा’ अशी घोषणा ऐकायला मिळाल्या आहेत. पुण्यातील मोशीमध्ये आयोजित राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात हा प्रकार घडला आहे. कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांचं (Rupali Chakankar) भाषण सुरु असतानाच काही जणांकडून अशी घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात एकच वादा अजितदादा अशा घोषणा ऐकायला मिळतात पण या कार्यक्रमात अजितदादांऐवजी महेशदादांच्या नावाचा जयघोष ऐकायला मिळाला आहे. त्यामुळे हा कार्यक्रम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

नेमंक काय घडलं?
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडूनही विविध मतदारसंघात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे. पुण्यात राष्ट्रवादीच्यावतीने कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला अजित पवार गटाच्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती.

कार्यक्रमात अनेक नेत्यांची भाषणे झाली पण जेव्हा रुपाली चाकणकर यांनी व्यासपीठावर भाषणाला सुरुवात करताच कार्यक्रमातील काही उत्साही कार्यकर्त्यांनी घोषणांचा जोर वाढवला. ‘एकच वादा…’ अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसरात आवाज दिला आहे. ‘एकच वादा…महेशदादा’ अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. ही घोषणाबाजी अचानकपणे भाषणादरम्यानच सुरु झाल्याने पर्यायी रुपाली चाकणकरांना आपलं भाषणंच थांबवावं लागलं आहे.

‘हिंगोली’च्या बैठकीत राडा! खासदार पाटील अन् मंत्री सत्तार यांच्यात खडाजंगी; वादाचं कारण काय?

घोषणाबाजी दरम्यान काही काळ कोणचाच काही ताळमेळ लागत नव्हता. एकीकडे रुपाली चाकणकरांना भाषण करायचं होतं पण दुसरीकडे कार्यकर्त्यांचं भाषण सुरुच होतं. अचानक कार्यक्रमात अशा घोषणा सुरु झाल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून या प्रकाराकडे आश्चर्याने पाहिलं जात होतं. त्याचवेळी माजी आमदार विलास लांडे यांनी हस्तक्षेप करीत कार्यकर्त्यांना आवर घातला. त्यानंतर परिस्थिती निवळल्याचं पाहायला मिळालं आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या समोर झालेल्या या प्रकारामुळे पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीच्या शहर पदाधिकाऱ्यांची मात्र चांगलीच फजिती झाल्याचं दिसून आलं आहे.

Exit mobile version