Download App

हाच चमत्कार उद्याच्या निवडणुकीत करायचायं; शरद पवारांचं एक विधान अन् दादांना धास्ती

हाच चमत्कार उद्याच्या निवडणुकीत करायचायं, असं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंयं. बारामतीमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

Sharad Pawar News : हाच चमत्कार उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत करायचा असल्याचं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलंयं. दरम्यान, नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या सुनेत्रा पवार यांचा पराभव केलायं. आता विधानसभेलाही हाच चमत्कार करण्याचे संकेतच शरद पवार यांनी जनतेला दिलेत. शरद पवार यांच्या या विधानामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची धास्ती वाढणार असल्याचं बोललं जात आहे. बारामतीच्या लोणी भापकरमध्ये आयोजित मेळाव्यात पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

चार दिवसांपासून चूल बंद, लेकरू उपाशी असताना घास कसा गोड लागेल? हाकेंच्या आईला अश्रू अनावर…

शरद पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत हे जे पाच-सहा लोक होते, यामध्ये एकही पुढारी नव्हता. कुठे गेले होते कुणास ठाऊक? मी विचारलं शेवटी हे होते का? ते होते का? पूर्वी आमच्या आसपास असायचे त्यातले कोणीच नव्हते. मग होते कोण सगळे नवखे तरुण मुलं, अल्पसंख्यांक समाज या सगळ्यांनी न बोलता आपले काम चोख केले. कळलच नाही त्यांना हे कसं झालं? मतमोजणी झाली तेव्हा कळलं अरे हा काय चमत्कार झाला आणि कोणी केला? त्याचे कारण एवढेच आहे की तुमच्याकडे चढउतार करण्याची ताकद आहे. हाच चमत्कार उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला करायचा आणि हाच चमत्कार उद्याच्या निवडणुकीच्या बरोबर इथला पाणी आणि दुधाचा प्रश्न तो कसा सुटत नाही? हे आम्ही बघू, असं मोठं विधान शरद पवार यांनी केलंय.

टीका करणं हा पंतप्रधान मोदींचा स्वभाव…
लोकसभा निवडणुकीसाठी देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्रात आले आणि त्यांनी माझ्या विरोधात भाषण केले. चांगली गोष्ट आहे देशाचा प्रधानमंत्री राज्यात येतो एकाच माणसाची आठवण ठेवतो, आपली आठवण ठेवतो म्हणजे चांगली गोष्ट आहे. काही काही लोक अशी असतात की ज्यांचा स्वभाव फक्त टिका टिप्पणी करायचा असतो, नाव ठेवायची, टीका करायची, अशी टीका शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर केलीयं.

दमदाटी केली तरीही लोकं घाबरले नाहीत…
निवडणुकीत कोणता बटन दाबायचं हे तुम्हाला सांगावं लागत नाही हे गेल्या पन्नास वर्षांचा माझा अनुभव आहे. कोणी दमदाटी केली तरी तुम्ही लोक घाबरले नाही. या निवडणुकीत आणखी एक गोष्ट चांगली झाली. आमचे बाकीचे सहकारी माजी नगराध्यक्ष सदाशिवराव सातव, यशवंत जगताप सतीश मामा हे सगळे लोक तुमच्याशी संबंध ठेवून गेली अनेक वर्षे काम करतायेत, तुम्ही सुद्धा एकमेकांना साथ देत आलेला आहात. या तुम्ही आतापर्यंत नेहमीच मदत केली, पाठिंबा दिला, सहकार्य केलं. या वेळेला आपल्याला महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे त्याला तुम्हा लोकांची साथ मिळेल अशी अपेक्षा शरद पवारांनी व्यक्त केलीयं.

मोठी बातमी : वाढीव आरक्षण ठरलं गाजराची पुंगी; नितीश सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने गुंडाळला

तसेच मुख्यमंत्री झाल्यावर आपल्या भागात जे करणे योग्य नाही असे मला सांगितलं तरी मी केलं. जनाई शिरसाई आणि दुसरी पुरंदर उपसा, त्याच्यातून काही ना काहीतरी पाणी. मी म्हणत नाही शंभर टक्के मदत झाली पण काहीतरी मदत झाली. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी या योजना चालू ठेवण्यासाठी काही गोष्टी करण्याची आवश्यकता होती. काही ठिकाणी पाईपलाईन खराब झाली, काही ठिकाणी आणखी काही अडचणी आल्या. ज्या वेळेला लोकांची आवश्यकता आहे त्या वेळेला सरकारचं हे काम आहे की त्याच्यात काही कमतरता असली तर ती दुरुस्त करायची पण पाणी नीट येईल याची काळजी घ्यायची. ज्या योजना आम्ही केल्या त्यांच्याकडे असे सरकार ढुंकवूनही बघत नाही. त्याचा परिणाम योजना झाली पण त्याचा पूर्ण फायदा कोणाला होत नाही. ही स्थिती आपल्याला दुरुस्त करायची आहे. आता कशी दुरुस्त करायची? राज्य त्यांच्या हातात आहे आणि म्हणून मी ठरवलं की काहीही झालं तरी राज्यात बदल करायचा असल्याचंही ते म्हणाले आहेत.

follow us