चार दिवसांपासून चूल बंद, लेकरू उपाशी असताना घास कसा गोड लागेल? हाकेंच्या आईला अश्रू अनावर…
OBC reservation : कुणबी आणि मराठा एकच असल्याचे सांगत मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) ओबीसीतून आरक्षण (OBC reservation) देण्याची मागणीसाठी उपोषण सुरू केलं. तर दुसरीकडे अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ लक्ष्मण हाकेंसह (Laxman Hake) त्यांचे सहकारी वाघमारे गेल्या आठ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, अशी मागणी हाके करत आहे. हाकेंनी पाण्याचा घोटही घेतला नसल्यानं त्यांची तब्येत खालावली असून त्यांच्या आईलाअश्रू अनावर झालेत.
टॉलीवूडमध्ये 10 वर्षे पुर्ण, Rashi Khanna ने सांगितलं जिव्हाळ्याच्या चित्रपटाचं नाव
आईची प्रकृती ठीक नाही, त्यामुळे तू उपोषणस्थळी येऊ नका, असा निरोप हाकेंनी पाठवला होता. मात्र, मुलाच्या पोटात अन्न नाही, आम्हाला अन्न गोड कसं लागेल? असा सवाल हाकेंच्या आईनं विचारला.
आमचं लेकरू उपोषण करत आहे. आमचा जीव बुडून गेला. आम्ही काय करावं? कसा आहे विचारलं की, फक्त आहे आहे म्हणतोय.. पण, निजूनच आहे… फार काही बोलत नाही… आम्हाला दिसतंय की, सगळं. आम्हाला अन्न गोड लागणार आहे का? त्याच्या पोटात पाण्याचा थेंब नाही की, अन्नाचा घास नाही. सरकारने आमच्या मुलाची तातडीने दखल घ्यावी, अशी आमची मागणी आहे, असं हाके यांच्या आईनं म्हटलं.
मराठ्यांना आरक्षण आम्ही काय नाही म्हणत नाही. पण, ओबीसींना आरक्षण द्यायला पाहिजे. तो काय मागणी करतोय, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मान्य करावी, असंही हाके यांच्या आईने म्हटले आहे.
यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलाचा पुढाकार! ज्येष्ठ नाट्यरसिकांसाठी विशेष सुविधा प्रदान
आमचा लक्ष्मण उपाशी आहे. मलाही आता बरं वाटत नाही. बोलायलाही सुचत नाही. का माझ्या मुलाकडे सरकार लक्ष देत नाही? शासनाने दखल घेऊन लक्ष द्यायला पाहिजे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, असे लक्ष्मण हाके यांच्या वडिलांनी म्हटले आहे.
वडेट्टीवारांच्याही डोळ्यात पाणी
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आंदोलनस्थळी जाऊन लक्ष्मण हाकेंची भेट घेतली. हाके यांची ढासळलेली प्रकृती पाहून वडेट्टीवार यांच्याही डोळ्यात पाणी आले. त्यांनी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आंदोलनाकडे लक्ष देण्याची विनंती केली. ओबीसीमध्ये 350 जाती असल्यानं आम्ही लवकर संघटीत होत नाही. पण, आता दिवसेंदिवस आक्रमक होत आहेत, त्यामुळे सरकारने फक्त बघ्याची भूमिका घेऊ नये, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला.
हाकेंच्या उपोषणाचा आठवा दिवस…
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाचा आज आठवा दिवस आहे. उपोषणामुळे हाके यांची यांची प्रकृती खालावली आहे. उच्च रक्तदाबामुळे त्यांना हृदयविकाराचा धोका उद्भवू शकतो, अशी भीती डॉक्टरांना आहे. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याची गरज असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. मात्र हाकेंनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.