Irfan Shaikh Death In Ahmedabad Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये गुरुवारी एअर इंडियाचे (Air India Plane Crash) बोईंग 787 ड्रीमलायनर विमान कोसळले. या अपघातात विमानातील सर्व 241 जणांचा मृत्यू झाला. एक प्रवासी बचावल्याचे वृत्त आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचे नाव रमेश विश्वास कुमार, असे सांगितले जात आहे. तो 11ए सीटवर प्रवास करत (Ahmedabad Plane Crash) होता. ही माहिती अहमदाबादचे पोलिस आयुक्त जीएस मलिक यांनी दिली आहे. तर या अपघातात 12 क्रू मेंबरचा मृत्यू झालाय, यात पुण्याचा (Pune News) इरफान देखील होता.
गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात इरफान शेख या 22 वर्षीय क्रू मेंबरचाही दुर्दैवी अंत झाला. इरफान हा पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम नगरमध्ये राहायला होता. आजी-आजोबा, आई-वडील, भाऊ असं कुटुंब असलेला इरफान दोन वर्षापासून एअर इंडियामध्ये कामाला लागला होता. इरफान नुकताच ईदसाठी घरी येऊन गेला होता. त्याच्या जाण्याने त्यांच्या नातेवाईकांना धक्का बसला आहे. त्याचा मृतदेह लवकर मिळावा, अशी मागणी नातेवाईक करत आहेत.
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार! अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स लागला हाती
डीएनए चाचणीनंतर ओळख पटवली जाईल
या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील होते. विमानात 242 प्रवासी होते. यामध्ये 53 ब्रिटिश, 07 पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होता. आतापर्यंत अपघातस्थळावरून 100 मृतदेह सापडले आहेत. बहुतेक मृतदेह इतके जळाले आहेत की त्यांची ओळख पटवणे खूप कठीण आहे. डीएनए चाचणीनंतरच त्यांची ओळख पटवणे शक्य होईल.
दैव बलवत्तर! होस्टेलवर विमान कोसळलं तरीही अकोल्याची ऐश्वर्या वाचली; आग अन् धुरातून केली सुटका..
डीएनए नमुने देण्याची व्यवस्था
आरोग्य विभागाचे प्रधान सचिव धनंजय द्विवेदी यांच्या मते, अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांची ओळख पटविण्यासाठी अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलने त्यांचे डीएनए नमुने गोळा करण्याची व्यवस्था केली आहे. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलच्या कसोटी भवनमध्ये डीएनए नमुने देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.