Download App

Pune News : बिल्डर पुत्राच्या कारनाम्याचा सर्वांनाच भुर्दंड! कोणालाच सोडणार नाही, पोलिस आयुक्तांचा इशारा

पुण्यातीलअपघात प्रकरणात कोणालाच सोडणार नसून घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा आयुक्त अमितेश कुमारांनी दिलायं.

Pune Accident : पुण्यातल्या कल्याणीनगर (Pune News) परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने Vedant Agrwal पोर्शे कारने तरुण-तरुणीला चिरडलं. या घटनेत तरुणीसह तरुणाचा मृत्यु झाला असून या प्रकरणी अल्पवयीन मुलाला न्यायालयाकडून जामीन देण्यात आलायं. याविरोधात न्यायालयात पोलिसांकडून याचिका दाखल करण्यात येणार असून अपघात प्रकरणी पब, बार, विना नंबर गाडी देणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, तरुण-तरुणीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या कोणालाही सोडणार नसल्याचंही आयुक्तांनी स्पष्ट केलंय.

पराभवाच्या भीतीने भाजपने रामाला मैदानात उतरवलं; घाटकोपरमधील बॅनरबाजीवरून राऊतांचे टीकास्त्र

आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, घटनेतील आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला जामीन मिळाला. मात्र, आम्ही याविरोधात सत्र न्यायालयात याचिका याचिका दाखल करणार आहोत. मुलाचे वडील आणि त्याला दारु देणाऱ्या पब मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलायं. तसेच कल्याणीनगर, कोरेगाव पार्क भागातील पब आणि बारवर कारवाई करण्यात येणार असून कोणालाही सोडणार नसल्याचं कुमार यांनी सांगितलंय.

या अपघातात अल्पवयीन मुलाकडे असलेल्या कारला नंबर नसल्याचंही समोर आलंय. त्यामुळे विना नंबर गाडी देणाऱ्या डीलरवरही कारवाई होणार आहे. तसेच अपघातानंतर पोलिस ठाण्यात ज्या लोकांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असेल त्यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार आहेत. यासोबतच कोझी बार आणि ब्लॅक बार या दोन बार चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

Box Office : ‘श्रीकांत’ बॉक्स ऑफिसचा बादशाह! 10 व्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी, ओलांडला 25 कोटींचा टप्पा

या घटनेतील अल्पवयीन मुलगा पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा आहे. त्याने अत्यंत बेदरकारपणे आलिशान कार चालवत रस्त्यावरील वाहनांना धडक दिली. यामध्ये दोघेजण चिरडले गेले. शनिवारी मध्यरात्री हा भीषण अपघात कल्याणीनगरमध्ये घडला. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवर असलेली तरुणी हवेत उडाली आणि त्यानंतर जमीनीवर आदळून तिचा जागीच मृत्यू झाला. अश्विनी कोस्टा असं मृत तरुणीचं नावं आहे. तर अपघातात जमखी झालेले अनिस अवलिया यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन कोर्टात हजर केलं. त्यावेळी वेदांत याचे वकील प्रशांत पाटील यांनी न्यायालयाला सांगितले की, घडलेली घटना दुर्दैवी असली तरी कलमात जामीन मिळण्याची तरतूद आहे. न्यायालयाने ही बाब मान्य करत त्याला जामीन मंजूर केलायं. मात्र, न्यायालयाने काही प्रमुख अटी व शर्तींसह हा जामीन मंजूर केलायं. त्यानुसार, आरोपीला येरवड्याच्या वाहतूक पोलिसात 15 दिवस काम करावे लागणार आहे. तसेच आरोपीने अपघातावर निबंध लिहावा, आरोपीने मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावेत, अशा अटी कोर्टाने घातल्या. व त्याचा अहवाल कोर्टाला सादर करावा, असं कोर्टाने सांगितलं.

follow us