Download App

Pune Accident : अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार; ससूनचे डॉ. तावरे अन् डॉ. हरलोर अटकेत

Pune Accident प्रकरणात आता मोठी अपडेट ससूनचे फॉरेन्सिक लॅब चे एचओडी डॉ अजय तावरे यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली अटक केली आहे.b

पुणे : कल्याणीनगर (Pune Accident) परिसरातील पोर्श कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठी कारवाई केली आहे. अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससूनचे फॉरेन्सिक लॅबचे एचओडी डॉ. अजय तावरे आणि सीएमओ डॉ. श्रीहरी हरलोर यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. संबंधित मुलगा अपघातावेळी दारु प्यायला होता की नव्हता याबाबतचा उलगडा या रिपोर्टमधून होणार होता. (Sassoon’s Forensic Lab HOD Dr. Ajay Taware and CMO Dr. Srihari Harlor has been arrested by the Crime Branch.)

Israel Hamas War : इस्त्रायलपुढे मोठं आव्हान; राजधानी तेल अवीववर हमासचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला

या अपघात प्रकरणात आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर हा तपास येरवडा पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. सध्या अल्पवयीन मुलगा बालसुधार गृहात आहेत. तर त्याचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल न्यायालयीन कोठडीत आहेत. याशिवाय मुलाचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांनाही अटक केली आहे. कार ड्रायव्हरला धमकी देणे आणि डांबून ठेवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यानंतर आता संबंधित मुलाच्या रिपोर्टमध्ये फेरफार केल्याच्या आरोपात दोन डॉक्टरांनाही अटक केली आहे.

दोन पोलिसांचे निलंबन 

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही पत्रकार परिषदेत अनेक खुलासे केले. या प्रकरणात सुरुवातीला येरवडा पोलिसांकडून दिरंगाई झाल्याचेही त्यांनी मान्य केले. त्यानंतर लगेचच दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी अशी दोघांची नावे आहे. तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही असा ठपका ठेवत दोघांचे निलंबन करण्यात आले आहे.

प्रकरण काय

19 मे च्या पहाटे भरधाव पोर्शे कार चालवून बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत दोन जणांचा जीव घेतला होता. या प्रकरणात सुरुवातीला त्याला पोलिसांकडून विशेष वागणूक दिली असल्याचा आरोप झाला. वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी येरवडा पोलीस स्थानक गाठले होते. त्यानंतर संबंधित मुलाला पिझ्झा-बर्गर देण्यात आल्याचे बोलले गेले. या सगळ्यात पोलिसांनी गुन्हा उशीरा दाखल केला आणि दुपारी ज्युवेनाईल जस्टिस बोर्डापुढे हजर करण्यात आले. तिथे निबंध लिहिण्यासारखी अत्यंत हस्यास्पद शिक्षा देत जामीनही देण्यात आला.

पश्चिम बंगालच्या Cyclone Remal चा राज्यावर परिणाम? अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा

या सगळ्या प्रकरणाची सोशल मिडीया आणि वृत्त माध्यमांमध्ये बरीच चर्चा झाली. त्यानंतर त्याचा जामीन रद्द करून त्याला 14 दिवसांसाठी बाल निरीक्षणगृहात पाठवण्यात आले आहे. तर विशाल अग्रवाल यांना अटक करुन त्यांचीही चौकशी करण्यात आली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. या दरम्यान, हा तपास येरवडा पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे हस्तांतरित केला गेला. त्यानंतर कार ड्रायव्हरला धमकी देणे आणि डांबून ठेवल्याच्या गंभीर आरोपांखाली मुलाचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांनाही अटक केली.

follow us

वेब स्टोरीज