Ajit Pawar : अमित शाहांकडे कोणाचीही तक्रार केली नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar : अजितदादा (Ajit Pawar)आजारपणातून बरे झाल्यानंतर पुन्हा अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. आज अजितदादांनी पुण्यात (Pune)पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना (Amit Shah)भेटण्यासाठी गेले होते, त्यावरुन राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर आज अजितदादांनी स्पष्टपणे आपली बाजू मांडली. अजितदादा म्हणाले की, एक गोष्ट […]

Ajit Pawar Amit Shah

Ajit Pawar Amit Shah

Ajit Pawar : अजितदादा (Ajit Pawar)आजारपणातून बरे झाल्यानंतर पुन्हा अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. आज अजितदादांनी पुण्यात (Pune)पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना (Amit Shah)भेटण्यासाठी गेले होते, त्यावरुन राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर आज अजितदादांनी स्पष्टपणे आपली बाजू मांडली. अजितदादा म्हणाले की, एक गोष्ट सांगतो मी तेथे कोणाचीही तक्रार केली नाही. तक्रार करणं माझ्या स्वभावातच नाही, असेही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.

सरकार मेगा भरतीचे गाजर दाखवतंय; पोलीस भरतीच्या मुद्द्यावरून शरद पवारांच्या शिलेदाराने सरकारला घेरलं

अजितदादा म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मला डेंग्यू आजार झालेला होता. माझे 15 दिवस त्याच्यामध्येच गेले. दुर्दैवाने मी कधीकधी टीव्ही पाहायचो. पेपर वाचायचो, त्यात हा आजार राजकीय आजार असल्याच्या बातम्या पाहायला मिळायच्या. त्याबद्दल मला फार वाटायचं.

‘तुमच्या त्रासाला कंटाळून किती लोकांनी राष्ट्रवादी सोडली?’ अजित पवार गटाचा आव्हाडांना सवाल

मी काही असला लेचापेचा माणूस नाही, जी काही माझी मतं असतात ती गेली 32 वर्षे मी स्पष्टपणे लोकांसमोर, पत्रकारांसमोर मांडत असतो, असला राजकीय आजारबिजार माझ्या स्वभावात नाही, रक्तात पण नाही, असे स्पष्टपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

राज्यामध्ये मराठा-ओबीसी आरक्षणाचा वाद चिघळल्यानंतर अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यू झाल्याची माहिती समोर आली. त्यावरुन विरोधक आणि माध्यमांमधून अजितदादांवर राजकीय आजार झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यावरुन अजितदादांनी आज परखड शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे.

यावेळी अजितदादा म्हणाले मी काही लेचापेचा माणूस नाही. माझी जी काही मतं असतात ती गेली 32 वर्षे मी स्पष्टपणे लोकांसमोर, पत्रकारांसमोर मांडली आहेत, असला राजकीय आजार-बिजार माझ्या स्वभावात नाही, रक्तात पण नाही, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

Exit mobile version