Download App

पुणेकरांसाठी गुडन्यूज! ‘या’ तारखेपासून बॅंकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू

Pune Bangkok flight Start from 22 November : पुणे ते बँकॉक विमानसेवा 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. दुबई, सिंगापूरनंतर आता पुण्यातून बँकॉकसाठी विमानसेवा सुरू होत आहे. 22 नोव्हेंबरपासून आठवड्यातून तीन दिवस ही विमानसेवा असेल. पुण्याहून दर बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे तीन दिवस ही विमानसेवा (Pune Bangkok flight) असेल. तर बँकॉकहून सोमवार, गुरुवार, आणि शनिवार असे तीन दिवस सेवा असणार आहे. पुण्याहून बँकॉकसाठी थेट विमान सेवा सुरू होत असल्याने पर्यटकांना देखील (Pune International Airport) त्याचा मोठा फायदा होणार आहे.

पुणे ते बँकॉक ही थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा (Pune Bangkok Flight) 27 ऑक्टोबरपासून सुरू होणार होती, ती 22 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आलीय. गेल्या महिन्यात, पुणे विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, दररोज पुणे-दुबई फ्लाइट आणि 27 ऑक्टोबरपासून पुणे-बँकॉकसाठी तीन वेळा साप्ताहिक फ्लाइट सुरू होईल. या आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झाल्याची घोषणाही केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली होती. IndiGo ने पुणे-बँकॉक फ्लाइटचे सुधारित वेळापत्रक 19 सप्टेंबर रोजी त्यांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं होतं.

मोठी बातमी : बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला दिलासा; मुंबई HC ने मंजूर केला जामीन

पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके म्हणाले की, अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना उड्डाणांची माहिती देण्यासाठी फ्लाइटच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय. गेल्या वेळी दुसऱ्या एअरलाइनने बँकॉकला उड्डाणे सुरू केली, तेव्हा त्यांना कमी प्रवासी असल्यामुळे सेवा स्थगित करावी लागली होती. अशीच परिस्थिती टाळण्यासाठी आता एअरलाइनने आपले वेळापत्रक बदलले आहे. 22 नोव्हेंबरपासून उड्डाणे सुरू होण्याची अपेक्षा असल्याचं ढोके म्हणाले आहेत.

भाजपचे माजी मंत्री राष्ट्रवादीच्या गळाला; राजकुमार बडोलेंच्या हाती ‘घड्याळ’

पुणे ते बँकॉक हे विमान बुधवार, शुक्रवार आणि रविवारी चालणार आहे. फ्लाईट रात्री 11.10 वाजता निघेल आणि पहाटे 4.45 वाजता पोहोचेल. बँकॉक ते पुणे परतीचे विमान सोमवार, गुरुवार आणि शनिवारी धावणार आहे. फ्लाईट सकाळी 1.15 वाजता निघेल आणि पहाटे 4.15 वाजता उतरेल. प्रवासी ऑनलाईन तिकीट बुक करू शकतात. आता बॅंकॉक ते पुणे प्रवास आणखी सोईस्कर होणार आहे.

 

follow us