Download App

‘दहशतवाद्यांना ठेचून मारा…’ कौस्तुभ गणबोटेंचे मित्र गहिरवले, आयुष्यात पहिल्यांदाच फिरायला गेला अन्…

Kaustubh Ganbote Killed In Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे काल 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला (Pahalgam Terror Attack) झाला. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यातील दोघेजण पुण्याचे (Pune News) आहेत. यामधील एका व्यक्तीचं नाव कौस्तुभ गणबोटे (Kaustubh Ganbote) असून त्यांचा भेळीचा व्यवसाय होता. त्यांचे मित्र अन् कुटुंबाकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय.

निषेध करावा तितका कमी आहे, असं त्यांच्या मित्राने म्हटलंय. तिथे मोदी सरकार रोजगार निर्माण करण्यासाठी अनेक प्रयत्न करीत आहेत. तरीदेखील अशी घाणेरडी कृत्य करत असेल, तर एकदा आरपारची लढाई केलीच पाहिजे. रोज-रोज मरण्यापेक्षा एकदा (Pahalgam Attack) मरण आलेलं परवडेल, असं त्यांनी म्हटलंय. देश सक्षम असताना, विशाल ताकद असताना आपण कोणाची वाट पाहात आहोत, असा प्रश्नच त्यांनी केलाय.

पहलगाम दहशतवादी हल्ला, एकाच दिवसात तब्बल 70% टूर रद्द; अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम

यावेळी लेट्सअप मराठीसोबत बोलताना पुण्याचे कौस्तुभ गणबोटे यांचे मित्र गहिवरले. त्या दहशतवाद्यांना घरात घुसून मारा, असं देखील त्यांनी म्हटलंय. आतंकवादाला खतपाणी घालणाऱ्या लोकांना ठेचून मारलं आहे. मोदींवर विश्वास आहे. त्यांचे बालपणीचे मित्र म्हणाले की, माझा बालपणीचा मित्र अशा घाणेरड्या पद्धतीने मारला गेलाय. याची सरकारने दखल घ्यावी. जसं आपल्या लोकांना मारलं गेलंय, त्यापेक्षा भयंकर पद्धतीने त्यांना मारावा. कधीही तो पुण्यातून बाहेर गेला नाही. आयुष्यात पहिल्यांदाच असा बाहेर फिरायला गेला होता.

घर-दार झालं. फरसाणचा ब्रांड तयार केला. कधी बाहेर गेला नाही. दोन महिन्यांपूर्वीच तो आजोबा झाला होता. बाहेर काश्मीरला फिरायला जातो म्हटला. पत्नीसोबत पाचजण फिरायला गेला होता. आयुष्यात पहिल्यांदाच फिरायला बाहेर गेला होता. आमचा मित्र अतिशय दुर्दैवीपणे गेला आहे. एका दुर्घटनेत वीस वर्षापूर्वी कौस्तुभ वाचला होता.

दहशतवाद्यांनी ओळख तपासणे, हा PM मोदींना संदेश; पहलगाम हल्ल्याचा संबंध रॉबर्ट वाड्रांनी हिंदुत्वाशी जोडला

अतिशय जिद्दीने व्यवसाय उभा केला होता. तो आमचा फॅमिली मेंबर होता. प्रत्येक कार्यात धावून पुढे यायचा. सर्वांनाच त्याची आठवण येणार आहे. त्यामुळे आता माघार घ्यायची नाही. नातेवाईकांना रडू कोसळतंय. अतिशय जिद्दीने त्यांनी व्यवसाय उभा केला होता. आयुष्यात पहिल्यांदाच फिरायला गेले होते, तिथेच त्यांच्यासोबत हा दुर्दैवी प्रकार घडला. ज्या लोकांनी हे कृत्य केलंय त्यांना ठेचून मारा, धडा शिकवा अशी मागणी त्यांच्या मित्रमंडळीने केली आहे.

 

follow us