Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा जीव घेणाऱ्यांचे रेखाचित्र जारी

  • Written By: Published:
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा जीव घेणाऱ्यांचे रेखाचित्र जारी

Pahalgam Terror Attack Terrorist Sketch : जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये काल (दि.22) झालेल्या दहशवादी हल्ल्यात (Terrorist Attack) 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर मोठी खळबळ माजली असून,  हल्ला करणाऱ्या दहशवाद्यांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. या सर्व घडमोडींमध्ये सुरक्षा यंत्रणांकडून पहलगामध्ये हल्ला करणााऱ्या दहशतवाद्यांचे स्केच (Pahalgam Terrorist Sketch) जारी करण्यात आले आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी या परिसराची रेकी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Pahalgam Attack : भाडेवाढ करू नका, तिकीट कॅन्सलेशन चार्चही रद्द करा; केंद्राचे विमान कंपन्यांना थेट निर्देश

कुणालाही सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा इशारा

जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाममधील दहशतवाद्यांनी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी त्यांचे नातेवाईक या हल्ल्यात गमावले त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. तसेच जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो. हल्ल्याने प्रभावित झालेल्या सर्वांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. या घृणास्पद कृत्यामागे असलेल्या दहशतवाद्यांना सोडलं जाणार नाही. त्यांचा दृष्ट अजेंडा यशस्वी होऊ दिला जाणार नाही. दहशतवाद्यांविरोधात लढण्याचा आपला निर्धार पक्का आहे आणि तो आणखी मजबूत होणार आहे.

काश्मीर हल्ल्यात पुण्याचे कौस्तुभ गणबोटे गेले, “माझा लाडका पुतण्या” म्हणत काकूंनी फोडला टाहो..

महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू

जम्मू काश्मीरमील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे भारतामध्ये संतापाची लाट आहे. मंगळवारी दहशतवाद्याने २6 पर्यटकांचा जीव घेतला. नाव विचारले, आयडी पाहिले अन् धडाधड गोळ्या झाडल्या. पोलिसांच्या वेशात आलेल्या या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुण्यातील दोघांचा समावेश आहे. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. मित्रांसोबत ते फिरण्यासाठी काश्मीरला गेले होते, पण त्यांची ती ट्रीप अखेरची ठरली.

तिन्ही दलांला अलर्ट राहण्याचे आदेश

पहलगाम येथील हल्ल्यानंतर केंद्रीय स्तरावर उच्चस्तरीय बैठका पार पडत असून, सुरक्षा दलांसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर सैन्याच्या तिन्ही दलांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube