Download App

अग्रवाल पिता-पुत्रास दिलासा? दोघांची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी

Pune Car Accident : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात चर्चेत असणाऱ्या पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात आज अल्पवयीन मुलाचे आजोबा

Pune Car Accident : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात चर्चेत असणाऱ्या पुण्यातील पोर्शे कार अपघात (Porsche car accident) प्रकरणात आज अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल (Surendrakumar Agarwal) आणि वडील विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना ड्रायव्हर अपहरण आणि धमकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. आज त्यांची पोलीस कोठडी संपली असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी वकिलांकडून या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का? याचा तपास करण्यासाठी आणखी 5 दिवस कोठडी वाढवुन देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती मात्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

सुरेंद्र अग्रवाल यांच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात कलम 438,420,464,565,467,468 आणि 34अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे तर विशाल अग्रवाल यांच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात कलम 304, 304 अ, 337,338,427 मो.वा.का. कलम 119,184,187 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

19 मे च्या पहाटे भरधाव पोर्शे कार चालवून बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दोन जणांचा जीव घेतला होता. या प्रकरणात ड्रायव्हरला धमकावल्याप्रकरणी तसेच अपहरण केल्या प्रकरणी सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात 31 मे पर्यंत दोघांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली होती.

‘मी जो बोलतो तेच करतो’ म्हणत शिंदेंची चौंडीमध्ये मोठी घोषणा

तर दुसरीकडे या प्रकरणात पुणे गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आरोपी अल्पवयीन मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससूनचे फॉरेन्सिक लॅबचे एचओडी डॉ. अजय तावरे आणि सीएमओ डॉ. श्रीहरी हरलोर यांना अटक केली आहे आणि तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नसल्याने येरवडा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी अशी दोघांची नावे आहे.

follow us