Pune Car Accident Ravindra Dhangekar Allegations on Hasan Mushrif : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांच्या सांगण्यावरून ससूनच्या दोन डॉक्टरांनी कल्याणीनगर कार अपघात ( Pune Car Accident ) प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केला असा धक्कादायक आरोप पुण्याचे महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांनी केला आहे. त्यावर मुश्रीफांनी देखील धंगेकरांना खोटा आरोप केल्याप्रकरणी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
तीन लाख रुपये घेतले, अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलले… ‘असं फुटलं ससूनच्या डॉक्टरांचे बिंग’
काय म्हणाले रवींद्र धंगेकर?
धंगेकर म्हणाले की, ससूनमधील डॉक्टर तावरे यांनी त्यांच्या कार्यकाळात असे अनेक रिपोर्ट बदलले आहेत. तसेच ते सुट्टीच्या दिवशी पहाटे बिल्डरचे फोन घेतात कसे? त्याचबरोबर मनोज पाटील सारखे अधिकारी देखील यामध्ये हस्तक्षेप करत असल्याचं लवकरच समोर येईल. त्यामुळे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजीनामा द्यावा. कारण त्यांच्या कार्यकाळामध्ये अशा प्रकारचे प्रकरण घडतच आहेत. ललित पाटील प्रकरणातील डॉक्टर संजीव ठाकूरला अद्यापही अटक झालेली नाही. याचा अर्थ या गुन्हेगारांना सरकार अभय देत आहे. असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.
SSC 10th Result 2024: दहावीत मुलीच हुशार! राज्याचा निकाल 95.81 टक्के, कोकण विभाग ठरला अव्वल
काय म्हणाले हसन मुश्रीफ?
तर रवींद्र धंगेकरांनी गंभीर आरोप करत राजीनाम्याची मागणी केल्यानंतर त्याला हसन मुश्रीफांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. मुश्रीफ म्हणाले की, पुण्याचे आमदार असलेल्या रवींद्र धंगेकरांना स्टंट करण्याची सवय लागली आहे. त्यांनी माझ्याबद्दल योग्य माहिती घेतली नाही. ही घटना घडली त्यावेळी मी परदेश दौऱ्यावर होतो.
तसेच माझ्या कार्यकाळामध्ये घडलेल्या ललित पाटील प्रकरणामध्ये तात्काळ चौकशी समिती नेमली आहे. डीन असलेल्या ठाकूर यांना पदमुक्त करण्यात आलं आहे. तसेच एका डॉक्टरांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या निकालामध्ये त्यांचा पराभव निश्चित असल्याने धंगेकर माझ्यावर अशा प्रकारचे आरोप करत आहेत. त्यांनी दोन दिवसात या प्रकरणी माफी मागावी. अन्यथा मी अब्रूनुकसानीचा दावा दाखल करेल. असा इशारा मुश्रीफांनी धंगेकरांना दिला आहे.
ससूनचे डॉ. तावरे अन् डॉ. हरलोर अटकेत
कल्याणीनगर (Pune Accident) परिसरातील पोर्श कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठी कारवाई केली आहे. अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससूनचे फॉरेन्सिक लॅबचे एचओडी डॉ. अजय तावरे आणि सीएमओ डॉ. श्रीहरी हरलोर यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. संबंधित मुलगा अपघातावेळी दारु प्यायला होता की नव्हता याबाबतचा उलगडा या रिपोर्टमधून होणार होता.