Download App

Pune Ganeshotsav : 28 तासांनंतर मिरवणुकांची शांततेत सांगता; पोलिस आयुक्तांनी मानले आभार

पुण्यातील मिरवणूक तब्बल 28 तासांनंतर संपल्या असून सर्व मिरवणुका शांततेत पार पाडल्याने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गणेशमंडळांचे आभार मानले.

Pune Ganeshotsav : मागील दहा दिवसांपासून सुरु असलेला गणेशोत्सवाची (Pune Ganeshotsav) सांगता काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी झाली. पुण्यातील मिरवणूक तब्बल 28 तासांनंतर संपल्या असून सर्व मिरवणुका शांततेत पार पाडल्याने पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी गणेशभक्तांसह मंडळांचे आभार मानले आहेत.

Lebanon Pager Blast : जगाला हादरा देणार प्लॅनिंग; मोसादने पाच महिन्यांपूर्वीच लिहिली होती स्फोटांची स्क्रिप्ट

पोलिस आयुक्त कुमार म्हणाले, पुण्यात गणेशोत्सवासाठी पुण्यात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. शहरात एकूण 8 हजार पोलिस तैनात करण्यात आले होते. तर लेजर लाईटवर बंदी घालण्यात आली होती, ज्या मंडळांकडून लेजर लाईट लावण्यात आली, त्या मंडळांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केलंय.

नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात; आयसीयूमध्ये उपचार सुरू, मुलगी निलोफरही घटनेत जखमी

दरम्यान, मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच विसर्जन करण्यात आलं असून यंदा तब्बल 25 तासांनंतर जड अंत:करणाने लालबागच्या राजाला निरोप देण्याता आलायं. पुण्यात मात्र यंदा रेकॉर्ड ब्रेक झाल्याचंच दिसून आलं आहे. तब्बल 27 तास उलडून गेले तरीही लाडक्या बाप्पाचं विसर्जन बाकी असल्याचं पाहायला मिळालं.

लालबागचा राजाच्या चरणी चिठ्ठी; बाप्पा, माझ्या नेत्याला आमदार कर, अजय चौधरींची मोठी कोंडी?

माहितीनूसार पुण्यात दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास 172 गणेशोत्सव मंडळ अलका टॉकीज चौकातून पुढे गेली होती. तर कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, लक्ष्मी रस्त्यांवरील गणपती अलका टॉकीज चौकातच पोहोचत होते. मागील वर्षी अलका टॉकीज चौकातून शेवटची गणपती विसर्जन मिरवणूक चार वाजण्याच्या सुमारास पुढे गेली होती.

सकाळी आठच्या सुमारास श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं विसर्जन :
सोनेरी मयुरपंखी रथाला गुलाब पुष्पांची आकर्षक सजावट आणि त्यावर कोल्ड फायरची विद्युत रोषणाई, ढोल ताशांचा गजर, मर्दानी खेळांचे सादरीकरण आणि भंडारा उधळत काढण्यात आलेल्या दिमाखदार मिरवणुकीने हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते.

‘कोणाच्या खांद्यावर कोणाचं ओझं’; शरद पवारांवर पत्रातून वार, बारामतीत ‘गब्बर’च्या व्हायरल पत्राने वादळ

अनंत चतुर्थीला आचार्य स्वामी गोविंद गिरी महाराज यांच्या हस्ते रंगारी बाप्पाची पुजा व आरती झाली. त्यांनतर साडेआठ वाजता वरद विघ्नेश्वर वाड्यातून मयुरपंखी रथातून बाप्पा महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्याकडे मार्गस्थ झाला. याठिकाणी प्रथा परंपरेनुसार टिळकांच्या पुतळ्याला आणि मानाच्या पाच गणपतींना ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून पुष्पहार घालून या वैभवशाली विसर्जन मिरवणूकीला सुरवात झाली. तर सकाळी साडे आठच्या सुमारास श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे भक्ती भावाने भावपूर्ण विसर्जन करण्यात आले.

 

follow us