Download App

Pune Metro : नदी पात्रांच्या भुयारातून धावली मेट्रो; बुधवारपेठ, मंडई, स्वारगेट कशी आहेत स्थानकं?

Pune Metro : पुणे मेट्रोने (Pune Metro ) सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट स्थानकाच्या भूमिगत मार्गावरील (Underground Way) चाचणी पूर्ण केल्याने आता काही महिन्यातच पुणेकरांचा या मार्गावरील मेट्रोचा प्रवास सुखकर होणार आहे. या मर्गाचे वैशिष्ट म्हणजे पुण्यातील मुळा, मुठा या दोन्ही नदी पात्रांच्या खालून धवणारी मेट्रो पुणेकरांसाठी ऐतिहासिक क्षण असणार आहे.

भुजबळ माझ्या नादी लागू नको, मंडल आयोग जाईल; मनोज जरांगेंनी धमकावलंच

या मार्गावरून जाताना बुधवार पेठ स्थानक आणि मंडई स्थानक ते स्वारगेट ही भूमिगत स्थानके असून सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक ते बुधवार पेठ स्थानक अंतर ८५३ मी, बुधवार पेठ स्थानक ते मंडई स्थानक अंतर १ किमी आणि मंडई स्थानक ते स्वारगेट स्थानक अंतर १.४८ किमी आहे. सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक ३३.१ मी खोल, बुधवार पेठ स्थानक ३० मी खोल, मंडई स्थानक २६ मी खोल आणि स्वारगेट स्थानक २९ मी खोल आहे.

पक्ष चोराचोरीत दंग असलेल्या महायुती सरकारला शेतकऱ्यांचा विसर; वडेट्टीवारांचे टीकास्त्र

पुणे मेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम करण्यासाठी मुठा, मुळा आणि पवना या ३ टनेल बोरींग मशीनचा (TBM) वापर करण्यात आला होता. बुधवार पेठ स्थानक हा मध्य धरून मुठा व मुळा या TBM ने कृषी महाविद्यालयातून भुयार खाणण्यास सुरुवात केली. तर पवना व मुठा २ मुठा चे पहिले भुयार खणून झाल्यावर त्याचा वापर पुन्हा करण्यात आला. या TBM ने स्वारगेट येथून भुयाराचे काम सुरु केले. पुणे मेट्रो प्रकल्पामधील भुयारी मार्गाचे खोदकाम काम दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजी सुरु करण्यात आले आणि एकूण १२ किमी भुयारी मार्गाचे खोदकाम काम दिनांक ४ जून २०२२ रोजी पूर्ण झाले.

ओमराजेंच्या विरोधात माजी IAS अधिकारी? भाजपच्या डोक्यात लातूर भुकंपातील ‘हिरोचे’ नाव

सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मार्गिकेचे कामपूर्णत्वाकडे चालले आहे हा मार्ग सुरु झाल्यानंतर पुणे शहरातील मध्यवर्ती भाग मेट्रो नेटवर्कला जोडला जाणार आहे आणि जलद व सुरक्षित असा शहरी वाहतुकीचा पर्याय या नागरिकांना उपलब्ध होणार आहे. तसेच येत्या काही महिन्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते स्वारगेट स्थानक असा प्रवास करणे शक्य होणार आहे.

यामुळे पिंपरी चिंचवड येथील नागरिकांना पुणे शहराच्या मध्यवस्तीत जाणे शक्य होईल. तसेच कसबा गणपती, दगडूशेट गणपती, रविवार पेठ, भाजी मंडई, स्वारगेट बस स्थानक, मुकुंदनगर, कसाब पेठ, लक्ष्मी रस्ता, कमलानेहरू रुग्णालय, गाडीखाना, शनिपार चौक, बाजीराव रस्ता, तुळशीबाग, सारसबाग, गणेश कला क्रीडा रंगमंदिर, नेहरू स्टेडियम इ. ठिकाणी मेट्रोने जाणे नागरिकांना शक्य होणार आहे.

follow us