भुजबळ माझ्या नादी लागू नको, मंडल आयोग जाईल; मनोज जरांगेंनी धमकावलंच
Manoj Jarange On Chagan Bhujbal : छगन भुजबळ माझ्या नादी लागू नको, नाहीतर मंडल आयोग जाईल, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan bhujbal) यांनी धमकावलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढल्यानंतर ओबीसी नेत्यांकडून अध्यादेशाला कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यावरुन भुजबळ आणि जरांगे यांच्यात वाकयुद्धच सुरु झालं आहे. मनोज जरांगे नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
Pradeep Sharma : एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर आयकर विभागाचा छापा; झाडाझडती सुरू
मनोज जरांगे म्हणाले, हा भुजबळांचा बालेकिल्ला आहे हे कोणी सांगितलं. हा नाशिकच्या जनतेचा आणि सर्व जातीधर्मांच्या जनतेचा बालेकिल्ला आहे, भुजबळाचा काय संबंध? सरकारला कोणी जरी काही सांगितलं तर जनताच बदल करत असते जनतेने बदल केलायं. मंडल मी आयोग संपवून दाखवणार आहे तू पुन्हा पुन्हा चिथावणी देऊ नकोस नाहीतर, तुझ्यासहीत बाहेर काढीन, तसलं चॅलेंज मला देऊ नकोस, या शब्दांत मनोज जरांगे यांनी धमकावलं आहे.
अजितदादांचा खास पठ्ठ्या शरद पवारांसोबत राहिला… जयंत पाटलांकडून अशोक पवारांचे तोंड भरून कौतुक
तसेच मी पाटीलच आहे म्हणूनच तर तूला ओबीसीत दाखवून आणलं आहे. तुझ्यासारखा असा ओबीसींचं खाऊन वर तंगडी करणारा मी नाही. खानदानी पाटील आहे तू म्हणाला होता ओबीसीत येणार नाही मी ओबीसीत आणले सगळे. पुन्हा सांगतो माझ्या नादी लागू नकोस मंडल आयोग जाईल. गोरगरीबांचं वाटोळं करु नको ओबीसींचं. चिथावणी करु नको, ओबीसी बांधवांना विनंती आहे मला मंडल आयोग चॅलेंज करायचं नाही पण भुजबळांना समजून सांगा. भुजबळ तू जर खानदानी ओबीसीचा नेता असेल तर नाभिक समाजाची माफी माग, असंही मनोज जरांगे म्हणाले आहेत.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी अध्यादेशाबाबत काही दगाफटका झाल्यास पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचा इशाराच दिला आहे. अध्यादेश काढल्यानंतर आता सरकारने कायदा पारित करण्याची मागणी मनोज जरांगे यांच्याकडून सातत्याने केली जात आहे. अशातच भुजबळांवर टीका करताना त्यांनी याआधीही मंडल आयोग चॅलेंज करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यावर बोलताना छगन भुजबळांनीही जोरदार टीका केली होती. मनोज जरांगे तू स्वत:ला काय समजतो, तू खरा पाटील असशील तर मंडल आयोग संपवूनच दाखव, असं छगन भुजबळ म्हणाले होते.