Download App

Video : न्यायालयात पोहोचताच विशाल अग्रवालवर शाईफेक; वंदे मातरम् संघटनेचे कार्यकर्ते ताब्यात

पुणे अपघात प्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल न्यायालयात पोहोचताच त्यांच्यावर वंदे मातरम संघटनेचे कार्यकर्त्यांनी शाई फेकली.

Image Credit: Letsupp

Pune Porsche Accident : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडलेल्या अपघातातील (Pune Porsche Accident) आरोपी अल्पवयीन मुलाचे वडिल विशाल अग्रवाल यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालय परिसरात पोलिसांचा पिंजरा दाखल होताच वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विशाल अग्रवाल (Vishal Agrwal) यांच्यावर शाईफेक केलीयं. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत विशाल अग्रवालवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आलीयं. यावेळी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने शाईफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

बातमी अपडेट होतेयं..

follow us

वेब स्टोरीज