Download App

Pune Car Accident : ब्लड सॅम्पल बदलणं भोवलं! दोन डॉक्टर अन् शिपायाचं निलंबन…

पुणे अपघात प्रकरणात आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हालनोर, शिपाई अतुल घटकांबळेचं निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर आलीयं.

Pune Car Accident : पुणे अपघात प्रकरणातील (Pune Car Accident) आरोपी अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलणं ससूनच्या दोन डॉक्टरांना आणि शिपायाला चांगलच भोवलंय. चौकशी समितीच्या अहवालानंतर डॉ. अजय तावरे, (Ajay Taware) डॉ. श्रीहरी हालनोर (shrihari Halnor) आणि शिपाई अतुल घटकांबळे (Atul Ghatkamble) यांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर आलीयं. पुणे पोलिसांकडून तिघांच्याही निलंबनाबाबतचा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठवला होता. त्यानंतर कारवाई करण्यात आलीयं.

Pune Car Accident : अंधारे, धंगेकरांची धडपड फक्त चमकोगिरीसाठी; शिंदेंचा नेता भडकला…

पुण्यातील कल्याणीनगर भागात अपघात घडल्यानंतर अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. आरोपीचं मेडिकल करण्यासाठी त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यावेळी त्याने मद्य प्राशन केलंय की नाही? या तपासणीसाठी आरोपीच्या ब्लडचे सॅम्पल घेण्यात आले. मात्र, दोन्ही डॉक्टरांसह शिपायाने आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याचं समोर आलंय. आरोपीने मद्य प्राशन केलं नसल्याचा रिपोर्ट ससूनच्या फॉरेन्सिक विभागाकडून देण्यात आला. त्यामुळेच आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला होता. प्रकरण शेकल्यानंतर अखेर पोलिसांना अल्पवयीन मुलाने मद्य प्राशन केल्याचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर पोलिसांनी ससूनच्या दोन्ही डॉक्टरांसह शिपायाला अटक केली. ब्लडचे सॅम्पल बदलण्यासाठी 3 लाख रुपयांची देवाण-घेवाण झाली असल्याचंही पोलिस तपासात उघड झालंय.

मराठवाड्यात कुणाची हवा? भाजपला कुठ-कुठ फटका बसणार? वाचा तज्ञांचं मत काय

अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल आणि ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे यांच्यात दोन तासांत 14 व्हॉट्सअप कॉलच्या माध्यमातून संभाषण झालं असल्याची माहिती सीडीआरमधून समोर आलीयं. या संभाषणादरम्यान, डॉ. तावरे यांनीच विशाल अग्रवाल यांना ब्लड बदलण्याबाबतचा सल्ला दिला असल्याची माहिती समोर आलीयं. दरम्यान, अपघातानंतर अल्पवयीन मुलाचे ब्लड रिपोर्ट बदलल्याचा आरोप डॉ. अजय तावरे यांच्यावर ठेवण्यात आलायं. या प्रकरणी डॉ. अजय तावरे यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

CM Shinde vs Sharad Pawar : शरद पवार अन् एकनाथ शिंदे यांनी एकमेकांविरोधात बोलणं का टाळलं? | LetsUpp

दरम्यान, डॉ. अजय तावरे याचाच ब्लड रिपोर्ट बदल्याण्याचा मुख्य प्लॅन होता, अशी माहितीही समोर आलीयं. डॉ. अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्यात व्हॉट्सॲप कॉल झाला. संशय येऊ नये म्हणून नॉर्मल फोन कॉल न करता व्हॉट्सॲपचा वापर करण्यात आला. डॉ. अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्यात व्हॉट्सॲप वरून संभाषण झालं आहे. दोघांचे संभाषण झाल्याचे ‘सीडीआर’ वरून समोर आले आहे.

follow us