पुणे रेल्वे स्थानकाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे, इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांची मागणी

Shrimant Kokate : पुणे रेल्वे स्थानकाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे. 

Shrimant Kokate

Shrimant Kokate

Shrimant Kokate : पुणे रेल्वे स्थानकाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे.  पुणे शहराची (Pune City) स्थापना राजमाता जिजाऊ यांनी केली आहे. आदिलशहाने पुणे शहर बेचिराख केले होते. या ठिकाणी गाढवाचा नांगर फिरवला आणि पुन्हा येथे मानवी वस्ती होणार नाही अशी घोषणा त्याने केली होती. मात्र राजमाता जिजाऊ शिवरायांना घेऊन या ठिकाणी आल्या आणि त्यांनी हे शहर पुन्हा वसवण्याचे काम केले. असं श्रीमंत कोकाटे (Shrimant Kokate) म्हणाले.

तसेच या ठिकाणी राजमाता जिजाऊ यांनी सोन्याचा नांगर फिरवला. परागंदा झालेल्या लोकांमध्ये त्यांनी आत्मविश्वास निर्माण केला. बेचिराक झालेले पुणे नव्याने वसवण्याची काम राजमाता जिजाऊ यांनी केले. आज घडीला पुण्याचा जो काही कायापालट झाला आहे त्या पाठीमागे फक्त राजमाता जिजाऊ आहेत त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनला राजमाता जिजाऊ यांचेच नाव देणे संयुक्तीक ठरेल. असं इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी म्हटले आहे.

राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली. पुणे शहर वसवले. त्यांनी जर हे केले नसते तर पुण्याची निर्मिती झाली असती का. तर पेशवे वगैरे शौर्य गाजवू शकले असते का? पेशव्यांसारखे सरदार छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊ मुळे तयार झाले आहेत. आपण लढू शकतो, जिंकू शकतो आणि उत्तम प्रकारे राज्य चालू शकतो ही भावना राजमाता जिजाऊ यांनीच निर्माण केली आहे. त्यामुळे पुणे स्टेशनला राजमाता जिजाऊ यांचेच नाव दिले पाहिजे. त्यामुळे मेधा कुलकर्णी यांनी रेल्वे स्टेशनला थोरला बाजीराव पेशवे यांचे नाव घेण्याची केलेली मागणी अत्यंत चुकीची आणि निराधार आहे.

मोर्चा काढला, आता दोन दिवसात मोठा बॉम्ब फोडणार; जलील यांचा मंत्री शिरसाटांना इशारा 

मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या मागणीचा आम्ही जाहीर निषेध करतो. मेधा कुलकर्णी यांनी मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास केला असता तर ही मागणीच त्यांनी केली नसती.  असं देखील ते म्हणाले.

Exit mobile version