छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक आणि धर्मरक्षकही : श्रीमंत कोकाटे

छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक आणि धर्मरक्षकही : श्रीमंत कोकाटे

मुंबई : छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होतेच त्याबरोबरच धर्मवीर देखील होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचं त्यांनी रक्षण केलं. त्यासाठी त्यांनी बलिदान देखील दिलं. ते स्वराज्यरक्षक जसे होते, तसे धार्मिक परंपरांना माननारे देखील होते, त्यामुळं ते धर्मरक्षक देखील होते, असे इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी सांगितले आहे. त्याचवेळी आपल्याकडील काही इतिहास अभ्यासकांनी छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम केला आहे.विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना ‘धर्मवीर ऐवजी स्वराज्यरक्षक’ म्हणावं असं विधान केलं होतं. यानंतर भाजपने त्यांच्याविरोधात राज्यभरात आंदोलन केलं. या विषयावर लेट्सअप मराठीचे विशेष प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांच्याशी संवाद साधला. यावेळी कोकाटे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलच्या विविध ऐतिहासिक मुद्द्यांवर भाष्य केलं.

कोकाटे म्हणाले की, संभाजी महाराजांनी बुधभुषणम, नखशिखांत (नखशिख), नायिकाभेद, सातशातक असे चार ग्रंथ लिहिले आहेत. त्या ग्रंथामध्ये संभाजी महाराजांनी शंभू महादेवाचे वर्णन केले आहे. भवानी मातेचं वर्णन केलंय. त्यांनी आपल्या धार्मिक परंपरेचा मोठा अभिमान होता. त्यामुळं ते जसे स्वराज्यरक्षक होते, तसे ते धर्मवीर देखील होते. आजच्या काळातील धर्मनिरपेक्ष आणि निधर्मी संकल्पना मध्ययुगीन काळातील महापुरुषांवर लादणं अनऐतिहासिक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराच, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती शाहु महाराज यांना स्वतःच्या धर्माचा अभिमान होताच, मात्र त्यांनी इतर धर्मियांचा कधीही अनादर केला नाही. शिवकाळात मराठा धर्म ही संकुचित संकल्पना नाही. त्यामध्ये बारा बलुतेदार येत होते, असेही कोकाटे म्हणाले. मध्ययुगात हिंदू असा संदर्भ येत नाही त्यात मराठा धर्म असा संदर्भ येतो.

छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते धर्मवीर नव्हते. अजित पवार यांचे वक्तव्य हे अर्धसत्य आहे. महाराज स्वराज्यरक्षक होते, हे सत्यच आहे. छत्रपती संभाजी महाराज शाक्त परंपरेंचे उपासक होते, असे संस्कृत पंडीत आणि प्राच्यविद्या पंडीत शरद पाटील सांगतात. शाक्त म्हणजे शक्तीचे उपासक, स्त्रीयांचा आदर-सन्मान करणारे असल्याचे सांगितले आहे. पुढे त्यांनी सांगितले की, इतिहासात शाक्तांमध्येही दोन पंथ आहेत. वैदिक आणि अवैदिक पंथ असे प्रकार आहेत. शरद पाटील त्यांची ब्राम्हणी आणि अब्राम्हणी अशी फोड करतात. त्यातील ब्राम्हणी पंथ बदनाम झालेला आहे. आणि संभाजी महाराज अब्राम्हणी होते, असेही श्रीमंत कोकाटे यांनी सांगितले.

विधानसभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात नाही. बाल शौर्य पुस्कार हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर… धर्मवीर… उल्लेख करतात. मी मंत्रिमंडळात असतानाही त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं, संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली, त्यानंतर भाजपनं त्यांच्या या विधानावरुन टीका केली जातेय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube