Supriya Sule : मराठा आरक्षणावरुन (Maratha reservation)राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या (NCP Sharad Pawar Group)खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस आणि अजितदादा सरकारवर जोरदार निशाणा साधला. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange)यांनी दोन महिन्यांचा वेळ देऊन मनाचा मोठेपणा दाखवला. राज्यातलं तिघाडी सरकार हे तारखांचा घोळ करण्यातच व्यस्त आहे. या तिघाडी सरकारमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती आहे का? असा सवाल यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.
ISRO मध्ये वादाचा अंक! माजी अध्यक्षांवर टीका? सोमनाथ यांच्याकडून आत्मचरित्राचं प्रकाशन रद्द
खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी खासदार सुळेंकडे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या आरोग्याबद्दल चौकशी केली. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री अजित पवार डेंग्यूने आजारी होते. आरोग्याच्या बाबतीमध्ये राजकारण करु नये, असेही यावेळी सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
Happy Birthday Virat Kohli : विराटचे 35 रेकॉर्ड्स! लवकरच सचिनचं ‘खास’ रेकॉर्डही तुटणार
पुण्यातील चांदणी चौकामध्ये होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. त्या ठिकाणी उड्डाणपूल उभा केल्यानंतरही या परिसरातील वाहतूक कोंडीवर काहीही परिणाम झाला नाही. त्याच पार्श्वभूमीवर खासदार सुळे यांनी चौकाची पाहणी करुन माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी खासदार सुळे म्हणाल्या की, मी पाच महिन्यांपूर्वी कांदा प्रश्न पेटणार असल्याचे सांगितले होते. वाणिज्य मंत्री पियुष गोएल यांनी त्याची दखल घेतली नाही. कांद्यावर चाळीस टक्क्यांचा कर चुकीच्या पद्धतीने लावण्यात आला. केंद्रासह राज्यातील सरकार शेतकरी आणि महिला विरोधी असल्याचाही आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
त्याचबरोबर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी मनाचा मोठेपणा दाखवत सरकारला दोन महिन्यांचा वेळ दिला आहे. सरकारकडून मात्र तारखांचा घोळ सुरु असून फसवणूक केली जात असल्याचाही आरोप यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केला आहे.