Download App

हगवणे पिता-पुत्राला 5 दिवसांची पोलीस कोठडी; भाजप महिला आघाडीकडून दोघांचा टोमॅटो फेकून निषेध

Rajendra Hagvane आणि दीर सुशिल हगवणे यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यानंतर कोर्टाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Rajendra Hagvane and son 5 Days Police Custudy in Vaishnavi Hagawane Death Case : बहुचर्चित पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील (Vaishnavi Hagawane Case) फरार आरोपी सासरा राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) आणि दीर सुशिल हगवणे (Sushil Hagawane) यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यानंतर या पिता-पुत्राला कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी कोर्टाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Apple लॉंच करणार स्मार्ट ग्लास, बिल्ट-इन कॅमेरासह मिळणार जबरदस्त फीचर्स

दरम्यान शिवाजीनगर कोर्टामध्ये या पिता-पुत्रांना आज दुपारी हजर करण्यात आले होते. या दोघांना किती दिवसांची कोठडी सुनावली जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्यांनंतर त्यांना कोर्टाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. म्हणजे 28 मे पर्यंत हे दोघे पोलिस कोठडीमध्ये राहणार आहेत. दुसरीकडे ही सुनावणी सुरू असताना कोर्ट परिसरात मात्र भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हगवणे पिता-पुत्र आणि कुटुंबाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी या दोघांना कोर्टात हजर केले तेव्हा महिलांकडून या दोघांवर टोमॅटो फेकून निषेध करण्यात आला. यावर भाजप महिला मोर्च्याच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी या महिलांना शाबासकी देखील दिली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरणं?

पुण्यातील राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन जीवन संपवल्यानं खळबळ उडाली. दरम्यान, वैष्णवीच्या मृत्यूवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच तिचा शवविच्छेदन अहवाल समोर आला. या अहवालातून काही धक्कादायक माहिती उघड झाली. गळफास घेऊन जीवन संपवणाऱ्या वैष्णवीच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या, असं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलंय.

जी.एस. महानगर सहकारी बँकेची निवडणूक रंगात; सासू-सुना एकमेकींविरोधात

शुक्रवारी वैष्णवी हगवणे हिने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर वैष्णवीच्या माहेरच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले होते. तसेच वैष्णवीचे वडील आनंद उर्फ ​​अनिल साहेबराव कस्पटे यांनी सासरच्या मंडळींविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. वैष्णवीचा पती, सासू-सासरे, नणंद आणि दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून वैष्णवीला क्रूर वागणूक दिली, असल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी त्यांच्या तक्रारीत केला होता.

रविवारी दारूची बाटली लागतेच…अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीताने सांगितला ‘ब्रँड’

वैष्णवी हगवणेच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या. या जखमांमुळे तिचा मृत्यू झाला असू शकतो, अशी शक्यता असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं या शवविच्छेदन अहवालामुळं आता या प्रकरणाला वेगळं वळण लागू शकतं. वैष्णवीने आत्महत्या केली का? की, तिच्यासोबत काही घातपात घडला? असे अनेक प्रश्न या अहवालामुळे निर्माण झालेत. या घटनेप्रकरणी वैष्णवीची सासू आणि नणंद यांना पोलिसांनी अटक केली होती, मात्र वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील सात दिवसांपासून फरार होते. या दोघांना शोधण्यासाठी पोलिसांचं पथक तपास करीत होतं. अखेर आज पहाटेच्या सुमारास एका छोट्याशा खेडेगावातून दोघांना अटक करण्यात आलीयं.

follow us