प्रेम प्रकरणापासून छळापर्यंत… मास्टरमाईंड करिश्मा हगवणेच! संपूर्ण कटाचा पोलिसांनी केला पर्दाफाश

प्रेम प्रकरणापासून छळापर्यंत… मास्टरमाईंड करिश्मा हगवणेच! संपूर्ण कटाचा पोलिसांनी केला पर्दाफाश

Karishma Mastermind In Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीची (Vaishnavi Hagawane) नणंद हीच संपूर्ण कटाची सुत्रधार असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. त्यामुळे आता संपूर्ण हगवणे कुटुंबाच्या अडचणींमध्ये (Pune Crime) मोठी वाढ झाली आहे. वैष्णवीचा छळ करण्यामध्ये तिची नणंद करिश्मा हगवणेच (Karishma Hagawane) पुढे होती. निलेश चव्हाण याचा या संपूर्ण प्रकरणात तिने वापर करून घेतला असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे याप्रकरणात निलेश चव्हाण याला सहआरोपी करण्यात आलंय.

खरं तर वैष्णवी अन् शशांकचं लग्न म्हणजेच एक मोठा कट होता. हा कट वैष्णवीच्या कुटुंबाकडून पैसे उकळण्यासाठी रचण्यात आला होता. या कटाची मास्टरमाईंड करिश्मा हगवणे होती, असं पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे. करिश्माने वैष्णवीच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती पाहून आपल्या भावाला तिच्यासोबत प्रेमसंबंध ठेवण्यास सांगितलं होतं. एवढंच नाही तर वैष्णवीला हगवणे कुटुंबाची सून करून घेण्यासाठी देखील करिश्मानेच शशांकला प्रवृत्त केलं होतं, अशी नवी माहिती आता पोलीस तपासातून बाहेर आली आहे.

बाताश्री शेलार! मुसळधार पावसात मुंबईत वातावरण तापलं… बॅनरबाजी करत शिवसेनेचा आशिष शेलारांवर हल्लाबोल

करिश्मानं वैष्णवीच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याचं हेरलं. वैष्णवीच्या कुटुंबाकडून लग्नात त्यांना चांगला हुंडा मिळू शकतो, याची खात्री पटल्यावर तिने भाऊ शशांकला वैष्णवीसोबत लग्न करण्यास सांगितलं. वैष्णवीच्या वडिलांनी लग्नामध्ये तब्बल 51 तोळं सोनं, चांदीची भांडी आणि फॉर्च्युनर कार गिफ्ट म्हणून दिली. लग्नानंतर वैष्णवीच्या वडिलांनी शशांकला अधिक महिन्यात सोन्याची अंगठी, दीड लाखाचा मोबाईल सुद्धा दिला.

“जयजयकार करू अहिल्यादेवींचा..” अहिल्यानगर गौरव गीताचे उत्साहात लोकार्पण

वैष्णवी आणि शशांकचं लग्न झाल्यानंतर करिश्माने मात्र वैष्णवीचा छळ सुरु केला. तिला सतत माहेरच्यांकडून पैसे आणण्यासाठी त्रास दिला जात होता. तर वैष्णवीच्या माहेरच्यांना धमकावण्यासाठी करिश्माने निलेश चव्हाण याचा वापर केल्याचं समोर आलंय. याच छळाला कंटाळून वैष्णवीने जीवन संपवल्याचं वृत्त समोर आलंय.

करिश्माने वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचं आठ महिन्यांचं बाळ निलेश चव्हाण याच्याकडे सोपवलं. जेव्हा कस्पटे कुटुंब आपल्या लेकीचं बाळ आणण्यासाठी निलेश चव्हाणच्या घरी गेलं होतं, तेव्हा निलेश चव्हाणने त्यांना बंदुकीचा धाक दाखवला होता. पोलिसांनी याप्रकरणी निलेश चव्हाणला देखील अटक करण्यात आली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube