पुणे : अमित शहा आणि मोहन भागवत यांच्या व्हीआयपी दौऱ्य वेळीच पुण्यात पालिका अधिकाऱ्याचा जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे. नुकतेच पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. त्यावेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये हा राडा झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांध्ये किरकोळ वाद झाला. त्यानंतर उपअभियंताने थेट पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला केली काठीने मारहाण आणि शिवीगाळ केली.
‘तुम्ही जामखेडच्या एमआयडीसीसाठी काय केलं?’ जुना इतिहास बाहेर काढत शिंदेंचा रोहित पवारांवर घणाघात
विश्रामबावाडा क्षेत्रीय अंतर्गत वैकुंठ स्मशानभूमी येते. अमित शहा आणि मोहन भागवत या ठिकाणी येणार असल्याने परिसरातील डागडुजी, आणि स्वच्छता करण्यासाठी सूचना वरिष्ठ अधिकाऱ्याने दिल्या होत्या. त्यानंतर संतापलेल्या उपअभियंताने थेट शिवीगाळ करत काठीने केली मारहाण केली.
कारवाई होणार?
दरम्यान, पालिकेची बदनामी होऊ नये म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्याकडून पोलिसात तक्रार नाही. मात्र या सर्व प्रकारची पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी घेतली गंभीर दखल घेतली असून, पालिका उपायुक्त सकपाळ यांच्याकडे घडलेल्या घटनेचा तातडीने अहवाल मागितला असून, शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या उपअभियंत्यावर आयुक्तांकडून निलंबनाची कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्हिआयपी व्यक्तींच्या दौऱ्यात अशा प्रकारची घटना घडल्याने सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पटेलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांना वेगळाच संशय; म्हणाले, हा तर देवेंद्र फडणवीसांना…
अनेक व्हिआयपी उपस्थित
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांच्या अंत्यसंस्कारावेळी पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे.पी. नड्डा यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवतांसह सहकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष शेलार यांच्यासह भाजपचे अनेक नेते मंडळींनी मोतीबाग येथे मदनदास देवी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर मदनदास देवी यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
कशावरून झाला वाद
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांच्या पार्थिवावरील अंत्यसंस्कारावेळी पुण्यात अनेक व्हिआयपी मंडळी उपस्थित राहणार होती. यासाठी वैकुंठ स्मशानभूमी परिसरातील डागडुजी आणि स्वच्छता करण्याच्या सूचना पालिकेच्या अधिकाऱ्याने संबंधित उपअभियंत्याला दिल्या होत्या. त्यानंतर संतापलेल्या उपअभियंताने थेट वरिष्ठ अधिकाऱ्याला शिवीगाळ करत काठीने केली मारहाण केली.