Download App

पोलिस शिंदे-फडणवीस सरकारचे घरगडी झालेत, ठोंबरे-पाटील कडाडल्या…

पुणे : महाराष्ट्राचे पोलिस शिंदे-फडणवीस सरकारचे घरगडी झाले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी सत्ताधारी सरकारला लगावला आहे. दरम्यान, काल ठाण्यात घडलेल्या घटनेप्रकरणी ठोंबरे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

‘झुकेगा नही घुसेगा डॉयलॉग भारीच’ पण, एक बाई तुमच्या घरात.. सुषमा अंधारेंचा फडणवीसांना सवाल

रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सत्तेत महिला सुरक्षित नसून महिलांचा राजकारणासाठी वापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच सत्ताधाऱ्यांनी आम्हाला धमक्या देऊ नये, असा सज्जड दम त्यांनी दिला आहे.

Adipurush च्या पोस्टरमधील ‘ती’ चूक भोवणार? ओम राऊतसह कलाकारांविरोधात तक्रार दाखल

राज्यात फक्त भाजप-शिवसेनेच्या नेत्यांच्या खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत. मात्र, ज्या महिलांवर अन्याय झालाय त्यांच्या तक्रारी देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानेच घेतल्या जात नसल्याचंही ते म्हणाले आहेत.

Nitin Gadakari : ‘अंधेरी रात मै दिया मेरे हात में, असे राहुल गांधी यांचे झाले’

ठाण्यात जी घटना घडली त्या घटनेवरुन उद्धव ठाकरे जे बोललेत ते योग्यच असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत. ठाण्यातल्या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस फडतूस असल्याचं ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरे म्हणाले ते योग्यच असल्याचंही त्या ठामपणे म्हणाल्या आहेत.

ठाणे पोलीस आयुक्तांविरोधात ठाकरे, आव्हाड, राऊत, विचारे उतरणार रस्त्यावर…

गृह खातं फडतूसच आहे त्यामुळे त्यांना फडतूस शब्द लागण्याचं कारण नाही. ज्यावेळी राज्यात महापुरुषांबद्दल बोलतात तेव्हा हीच लोकं मूग गिळून गप्प बसलेली असतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

यावेळी बोलताना त्यांनी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंवरही निशाणा साधला आहे. निवडणुकीत बारामती मतदारसंघासाठी निवडणूक लढविण्यास इच्छूक असल्याचं देसाईंनी स्पष्ट केलंय. त्यावर कोण तृप्ती देसाई मी ओळखत नाही, लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

Tags

follow us